HW News Marathi
राजकारण

कर्नाटकातील भाजपचे नेते जनार्दन रेड्डी यांना अटक

बंगळुरू | कर्नाटकातील भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री जनार्दन रेड्डी यांना सेंट्रल क्राइम ब्रँचने अटक केले आहे. रेड्डी यांनी अँबिडेट भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच रेड्डी यांच्याबरोबरच त्यांचा सहकारी महफूझ अली खान याला देखील अटक केले आहे. रेड्डी यांना न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

रेड्डी आणि खान यांनी अँबिडेट मार्केटिंगकडून १८ कोटी रुपये किमतीचे सुमरा ५७ किलो सोने घेतले होते. हे सोने प्रवर्तन निर्देशालयाच्या अधिकाऱ्यांपासून अँबिडेंटचे प्रमोटर सय्यद अहमद फरीद यांना चौकशीत ढिलाई मिळवून देण्यासाठी घेण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणात क्राइम ब्रँचने रेड्डी आणि खान यांना रविवारी चौकशीसाठी नोटीस पाठवले होते.

जनार्दन रेड्डी हे शनिवारी एजन्सीसमोर हजर झाले होते. त्याच वेळी क्राइम ब्रँचचे सीपी आलोक कुमार यांनी सांगितले की, सबळ पुराव्यांच्या आधारावर रेड्डी यांना अटक करण्यात आली आहे. आता रेड्डी यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येईल. तसेच जप्त करण्यात आलेले पैसे गुंतवणुकदारांना दिले जातील.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

News Desk

मुकेश अंबानी आणि मोदींमध्ये दुरावा, काँग्रेसशी जवळीक ?

News Desk

“सत्ता तुमच्या बुडाखाली ठेवण्याची राक्षसी महत्वकांक्षा येते, तेव्हा …,” उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

Aprna