HW News Marathi
मुंबई

‘चितळे बंधुं’चे कामगार संपावर!

मुंबई – सणावारांचा ऐन श्रावण महिना सुरू असतानाच पुण्यातील सुप्रसिद्ध ‘चितळे बंधू मिठाईवालेयांच्या एका उत्पादन केंद्रामधील १२० कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे खवय्यांची पंचाईत झाली आहे. या संपामुळे चितळे यांच्या दुकानांत सध्या नारळबर्फी, डिंक लाडू, रवा लाडू, स्पेशल मोतीचूर लाडू, आंबावडी, आलेपाक, स्पेशल चिवडा हे पदार्थ मिळत नाहीत. दुकान व्यवस्थापनाने मात्र सर्व कामकाज सुरू असल्याचा दावा केला आहे.

चितळे स्वीट्सची गुलटेकडी येथे दोन उत्पादन केंद्र आहेत. त्यापैकी एका उत्पादन केंद्रातील १२० कर्मचारी पगारवाढीच्या मागणीसाठी २० जुलैपासून संपावर आहेत. हे सर्व कर्मचारी राष्ट्रीय श्रमिक संघटनेशी संलग्न आहेत. गुलटेकडी येथील एक उत्पादन केंद्र बंद असल्याने उर्वरित उत्पादन केंद्रावर अतिरिक्त भार आला आहे. या केंद्रात उत्पादित केले जाणारे खाद्यपदार्थ पुणेकरांची मागणी पूर्ण करू शकत नाहीत, असे चित्र आहे.

दरम्यान, चितळे यांच्या दुकानामध्ये काही अपरिहार्य कारणांमुळे नारळबर्फी, डिंक लाडू, रवा लाडू, स्पेशल मोतीचूर लाडू, आंबावडी, आलेपाक आणि स्पेशल चिवडा हे पदार्थ मिळणार नाहीत,’ असा फलक लावण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्रकार हरमन गोम्स यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला

News Desk

भुयारी मार्ग की, स्वीमिंग पूल…

swarit

भुजबळांच्या प्रकृतीत बिघाड, जसलोक रुग्णालयात केल दाखल

News Desk