HW News Marathi
मुंबई

विसर्जनानंतर स्वच्छतेसाठी दादर चौपाटीवर पर्यावरण प्रेमी एकटले

मुंबई | आपल्या लाडक्या बाप्पाचे दिमाखात आणि जल्लोषात स्वागत केलं जाते. यानंतर अनंत चतुर्दशीला ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला भावुक मनांनी निरोप दिला जातो. विसर्जनासाठी पालिका आणि महाराष्ट्र पोलिसांनी मुंबईतील चौपाटीवर कडेकोट बंदोबस्त केला होता. परंतु अनेक गणेश भक्त बाप्पाला निरोप देताना, प्लॉटिकच्या पिशव्या, निर्माल्य आणि खाद्यापदार्थांची आवरणे चौपाटीवर टाकून निघून गेले.

एवढंच नव्हे तर समुद्रात योग्यरित्या बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन न केल्यामुळे ते पुन्हा किनाऱ्यावर आल्या होत्या. बाप्पाच्या मुर्तीची ही आवस्था आपल्याला डोळ्याने पाहून कुठे तरी मन दुखावले जाते. दादर चौपाटी स्वच्छ करण्यासाठी पर्यावरण प्रेमी, व्यासायिक आणि किर्ती कॉलेजचे विद्यार्थ्यी ऐकवटलं होतं. या सर्वांनी ऐकत्र येऊन दादर चौपाटीचे रुपडे पालटले. तसेच किर्ती कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दादर चौपाटी स्वच्छ करण्यासाठी फक्त पुढाकारच घेऊन न थांबता, या विद्यार्थ्यांनी प्लॉस्टिक बंदी आणि पर्यावरण असे सामाजिक संदेश देणारे पथनाट्य चौपाटीवर सादर केलं.

प्रसिद्ध ऑर्किट हॉटेलचे मालक आणि व्यावसायिक विठ्ठल कामत हे त्यांच्या सहकार्यांसोबत चौपाटी स्वच्छ करण्यासाठी सहभागी झालं. गेली अनेक वर्षापासून लोकांपर्यंत वेगवेळ्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे काम केल्याचे विठ्ठल कामत यांनी एच. डब्ल्यूशी बोलताना सांगितले.

तसेच पर्यारण प्रेमी आणि जय फाऊंडेशनचे अध्यक्ष जय शृंगारपुरे हे गेल्या दीड वर्षापासून दादर चौपाटी स्वच्छ करण्याची मोहिम त्यांनी हाती केली आहं. गतवर्षाच्या तुलनेत यंदा लोकांमध्ये काही अंशी का होईल ना, परंतु पर्यावरणा संदर्भात जनजागृती झाल्याचे चित्र दिसून आलंय असल्याचे यावेळी जय शृंगारपुरे यांनी एच.डब्ल्यूला सांगितलं.

दादर चौपाटीवर स्वच्छ करण्यासाठी भावी पिढी, वयोवृद्ध आणि तरुण अशा प्रत्येक वयोगटातील नागरिकांनी आवर्जुन सहभागी झाले. त्यामुळे येत्या काळात पर्यावरण संवर्धनाला उत्तम प्रतिसाद मिळू शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उच्च न्यायालयाची राजकीय पक्षांना नोटीस

Gauri Tilekar

आरपीएफ उपनिरीक्षकाच्या आत्महत्येचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद

swarit

शेतकऱ्यांचा संप मागे

News Desk