HW News Marathi
मुंबई

मुंबईत ३१ मार्चला सगळ्यात जास्त कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव हा तासागणिक वाढतच आहे. मुंबईत १६ आणि पुण्यात २ अशा नव्या कोरोना रुग्णांची नोंद काल (३१ मार्च) झाली असून आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३२० वर पोहोचली आहे. काल (३१ मार्च) एका दिवसात ५९ नव्या कोरोना रुग्णांची मुंबईत भर पडली आहे. ३० मार्चला ४७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या ६ एप्रिलपर्यंत आणखी रुग्णांची भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाचा विळखा हळूहळू मुंबईच्या झोपडपट्टीतही आपली पकड बसवू लागला आहे. दरम्यान, या रुग्णांच्या संपर्कात जर कोणी आले असेल किंवा कोरोनाची लक्षणे जरी दिसली नाहीत तरी व्यक्तींनी स्वतला १४ दिवस होम क्वॉरंटाईन करणे गरजेचे आहे. चाळ, किंवा झोपडपट्टीत लाहानशा घरात एकाच वेळी अनेक माणसे राहात असल्याने क्वॉरंटाईन करणे शक्य नसल्यास अशा व्यक्तींच्या क्वॉरंटाईनसाठी खाजगी इमारती व जहाजे ताब्यात घेण्याचा आदेश महापालिका आयुक्त परदेशी यांनी दिला आहे.

मुंबईत २३ मार्चला परदेशातून शेवटचे विमान आले होते. त्याला मुंबईत येऊन ६ एप्रिलला १४ दिवस होणार असल्याकारणाने आत्तापर्यंत मुंबईत वाढलेल्या आकड्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील विविध भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाहता वस्त्या, संकुल, वरळी कोळीवाडा, गोरेगावचे बिंबीसार नगर पोलीसांकडून सील करण्यात आले आहे. तसेच, क्वॉरंटाईनची सुविधा करण्यासाठी हॉटेल, वसतिगृहे, धर्मशाळा, सभागृहे, जिमखाना, जहाजे ताब्यात घेण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून अनेक भागात निर्जंतूकीकरण केले जात आहे. याय संदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल (३१ मार्च) आढावा बैठकही घेतली होती. यात शहरातील काही भागांत संस्थांकडून खाजगी निर्जंतूकीकरण केले जाते. परंतू, या निर्जंतूकीकरणात सोडियम हायपोक्लोराईटचा वापर या निकषानुसार करावा लागतो. त्यामूळे कोणत्याही खाजगी निर्जतूकीकरणास सक्त मनाई करण्याचा निर्णय या आढावा बैठकीत घेण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘साई संस्थेचा’ प्लास्टिक बंदीला मोलाचा हातभार

News Desk

राज ठाकरेंच्या अल्टिमेटनंतर माहिम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर BMC ची कारवाई

Aprna

‘सर्वांना परवडणारी घरे’ विषयावर मुख्यंत्र्यांना विचारा प्रश्न

News Desk