HW News Marathi
मुंबई

पवई तलावातील जलक्रीडा सुविधेला मगरींचा अडथळा

मुंबई | पवई तलावात जलक्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा आग्रह नगरसेवकांनी धरला होता. तसा ठरावही पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला, पण तलावात मगरींचा वावर असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने जलक्रीडाची मागणी फेटाळत पालिका सभागृहातील ठराव निकाली काढला त्यामुळे मुंबईकरांना जलक्रीडापासून वंचित राहावे लागणार आहे.

पवई तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी होत नाही. मात्र हे पाणी औद्योगिक कंपन्यांसाठी वापरण्यात येते हा तलाव मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असून अनेक पर्यटक व मुंबईकर या ठिकाणी भेट देतात. पण येथे जलक्रीडा सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची घोर निराशा होते. त्यामुळे पालिकेने या तलावात स्कुबा डायविंग, वॉटर एरोबिक्स, वॉटर फॉल, बोट रेसिंग ड्रायविंग ऑफ स्प्रिंगबोर्ड आदी जलक्रीडा सुविधा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून मुंबईकरांना विरंगुळ्याचे केवळ एक ठिकाणच उपलब्ध होणार नाही तर महापालिकेच्या महसुलातही वाढ होईल. याकडे सभागृह प्रशासनाचे लक्ष वेधले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांच्या ठरावाला सभागृहाने ऑक्टोबर २०१८ मध्ये मंजुरी देऊन तो ठराव आयुक्तांकडे अंमलबजावणीसाठी पाठवला होता यावर जल अभियंत्यांनी अभिप्राय दिला आहे.

पवई तलावात जैवविविधता भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. या तलावात मोठ्या संख्येने मगरींचा वावर आहे. यासाठी पवई तलावाचे संवर्धन करण्यात येणार आहे. तलावाच्या किनाऱ्यालगत सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते. परंतु, ‘मुंबई मेट्रो मार्ग ६’मुळे हे काम स्थगित आहे. पण लवकरच हे काम सुरू करण्यासाठी मेट्रो प्रशासन तशी समन्वय साधण्यात येत आहे. पण, या सुशोभीकरण जलक्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नाही. तसे केल्यास सजीवसृष्टीला धोका संभवत याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या तलावात मगरीचा वावर असल्यामुळे जलक्रीडा करतांना नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे जलअभियंता विभागाने आपल्या अभिप्रायमध्ये स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंकी हिलजवळ रेल्वे ट्रॅक खचला , रेल्वे वाहतुकीवर परिणाम

News Desk

मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी महापालिकेला ३१ मे ची डेडलाइन

News Desk

वांद्रे प्रकरण : आदित्य ठाकरेंच्या ट्विटवर हरभजन सिंहने दिले उत्तर

News Desk