HW News Marathi
मुंबई

महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार

मुंबई | दादर स्थित शिवाजी पार्क येथे असलेल्या शिवाजी महारांच्या पुतळ्याला एक वेगळा इतिहास आहे. शिवाजी पार्क मध्ये असलेल्या महारांजाच्या या पुतळ्यामुळे या मैदानाला शिवाज पार्क हे नाव देण्यात आले. पार्कातला हा भव्य पुतळा दादर स्थित प्रत्येकासाठी आकार्षणाचा केंद्रबिंदू आहे. परंतु सध्या शिवाजी पार्कवरील महाराजांच्या या पुतळ्याच्या रंगरंगोटीच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-याने भ्रष्टाचाराचार केल्याचे उघडकीस आले आहे.

या भ्रष्टाचाराचा निषेध म्हणुन मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी यांनी संबंधित अधिका-याची खुर्चीच कार्यालयातुन आणुन शिवाजीपार्क मध्ये बुधवारी बसवली.

शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करुन सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या काळात महारांच्या पुतळ्यावरुन भ्रष्टाचार झाल्यामुळे अनेकांच्या भुवया सध्या उंचावल्या आहेत. पुतळ्याच्या सुशोभीकरणातच घोळ घातल्यामुळे या पुतळ्याच्या सुशोभीकरणावर सध्या प्रश्न उपस्थित होत आहेत.

पुतळ्याच्या कामासाठी २२ मार्च रोजी २५ लाख ९२ हजार ८०० रुपयांची निविदा जाहिरात देण्यात आली. परंतु ही निविदा प्रक्रिया पुर्ण होण्याआधी यामध्ये परस्पर घोळ घातलत मर्जीतल्या कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने काम दिले आहे त्यामुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी अधिका-याची खुर्चीच कार्यालयातुन आणुन शिवाजीपार्क मध्ये बुधवारी बसवल्याचे पहायला मिळाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानखुर्दमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांनी केली पोलिसांना मारहाण

News Desk

रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज विशेष ‘मेगाब्लॉक’

swarit

विकासकांचा ३४० ते ४२० चौरस फुटांच्या घरांकडे ओढा

News Desk