मुंबई | दिल्ली विधानसभेच्या निकालाचे येणारे अपडेट पाहता अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाने मोठी आघाडी घेतलेली दिसून येत आहे. यंदाच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आप पक्षच बाजी मारणार असे सध्याच्या निकालावरुन तरी स्पष्ट होताना दिसत आहे. तर दुसरीकडे निकालाच्या याच पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशद्रोह्यांना मतदान करु नका आणि तेच दिल्लीच्या जनतेने ऐकले आणि देशद्रोही भाजप पक्षाला नाकारले’, असे टोलेबाजीचे ट्विट नवाब मलिक यांनी केले.
मोदी जी ने दिल्ली चुनाव में जनता से अपील की थी के वे एन्टी नॅशनल के खिलाफ मतदान करें,
जनता ने मोदी जी की सलाह मान मतदान कर भाजपा को एन्टी नॅशनल घोषित कर दिया।#DelhiResults #DelhiElectionResults— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) February 11, 2020
मोदींचा सल्ला ऐकून दिल्लीतील जनतेने मतदान प्रक्रियेतून भाजपला देशद्रोही घोषित केल्याचेही नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटरद्वारे म्हटले आहे. भाजपचे ‘चाणक्य’ अमित शाहांच्या ४० सभा झाल्या, २७० खासदार प्रचारात होते. अनेक आजी-माजी मुख्यमंत्री दिल्लीत तळ ठोकून होते. हजारो कोटी रुपये खर्च केले. पण तरीही भाजपचा पराभव झाला. यापुढे बिहार, उत्तर प्रदेशसह सर्वच राज्यातून भाजप हद्दपार होईल, असा विश्वासही नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, दिल्लीत आपचीच जादू कायम राहणार आणि एक्झिट पोलने दिलेला अंदाजही अगदी तंतोतंत पुर्ण होणार सद्यस्थितीला तरी दिसून येत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.