HW News Marathi
मुंबई

तारक मेहता का उल्टा चष्मा मधील डॉ. हाथी यांचे हृदय विकाराने निधन

मुंबई | तारक मेहता का उल्टा चष्मा मधील डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांचे आज हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले आहे. या मालिकेतील डॉ. हंसराज हाथी प्रेक्षकांचे प्रचंड लाडके होते. ही भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांची आज तब्येत बरी नसल्याने ते चित्रीकरणासाठी येऊ शकणार नाहीत, असा त्यांनी सकाळी दिगदर्शकांना कळविले होता. त्यांना सकाळ पासूनच अस्वस्थ वाटत होते. घरातच त्यांना हृदय विकाराचा धक्का आल्याने त्यांना मीरा रोडमधील नजीकच्या रुग्णालयात आज नेण्यात आले होते. पण तिथे त्यांचे निधन झाले.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला लवकरच दहा वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर आज एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती. पण, त्या आधीच ही दुःखद बातमीने आली. मालिकेच्या टीमला चांगलाच धक्का बसला आहे. या कार्यक्रमाचे निर्माते असित कुमार मोदी यांना या गोष्टीचा धक्का बसला आहे. ते सांगतात, कवी कुमार आझाद एक चांगले कलाकार आणि व्यक्ती होते.पण, आता जी बातमी आली त्याने आम्हाला सगळयांनाच मानसिक धक्का बसला आहे.

कवी कुमार आझाद यांनी छोट्या पडद्याप्रमाणे मोठ्या पडद्यावर देखील काम केले आहे. मेला या चित्रपटात आमिर खान सोबत ते झळकले होते. त्यांना तारक मेहता या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ते एक चांगले कलाकार असण्यासोबतच एक चांगले कवी होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता घ्या.” – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Chetan Kirdat

उच्चशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांने केलीआत्महत्या

swarit

राज्यात ‘कोरोना’चे ४७ नवीन रूग्ण आढळल्याने ‘टेन्शन’ वाढले

News Desk