HW News Marathi
मुंबई

जोरदार पावसामुळे मुंबईकरांचे हाल, मध्य रेल्वे ठप्प

मुंबई | रात्रीपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवर वाहतूक उशिराने सुरू आहे. दोन्ही मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिट उशीरा होत आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेच्या या रडगाण्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे शनिवारी सकाळी प्रचंड हाल झाल्याचे पहायला मिळाले. संततधार पावसामुळे दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक मंदावली असून याचा फटका प्रवाशांना बसताना पहायला मिळाला.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची कर्जत ते कल्याण दरम्यानची वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. कर्जत स्थानकात रुळावर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. रुळांवर जवळपास १० ते ११ इंच पाणी साचल्याचे समोर येत आहे. अंबरनाथसह अन्य रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली आहे. कर्जत रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्याने प्रगती एक्सप्रेसची वाहतूक वळवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, वसई-विरार आणि रायगड या भागांना मुसळधार पावसाने झोडपले असून पावसामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक विलंबाने सुरु आहे. मध्य रेल्वेवरील लोकल गाड्यांची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे.

भुसावळ-पुणे एक्स्प्रेस कल्याण-कर्जत मार्गावरुन तर पुणे-भुसावळ एक्स्प्रेस दौंड-मनमाड मार्गावर वळविण्यात आली. कर्जत-चौक दरम्यान रुळावर पाणी साचल्याने ११०२५ भुसावळ-पुणे एक्स्प्रेस कल्याण-कर्जत मार्गावरुन वळवण्यात आली आहे. तर ११०२६ पुणे- भुसावळ एक्स्प्रेस दौंड–मनमाडमार्गे वळवण्यात आली आहे. तर १२१२६ प्रगती एक्स्प्रेस आणि १७६१४ नांदेड–पनवेल एक्स्प्रेसही कर्जत–पनवेलऐवजी कर्जत–कल्याण मार्गावर वळवण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाईंदरमध्ये तृतीयपंथीयांना मारहाण

swarit

वाशी खाडी पूल दुरुस्तीसाठी बंद

swarit

‘अर्धवट तथ्य’ असलेल्या गोष्टी सांगू नका किंवा काँग्रेस पक्षा सोडा !

swarit
महाराष्ट्र

येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

News Desk

नागपूर | महाराष्ट्राच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. शुक्रवारपासून नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावासाचा जोर शनिवार आणि रविवारी देखील कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्या कडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागपूरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शुक्रवारपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूकीला अडतळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. याशिवाय काही भागांमधील वीजपुरवठादेखील खंडित झाला असून लोकांचे प्रचंड हाल देखील झाले. शुक्रवारी मुसळधार पावसाचा फटका विधीमंडळाच्या कामाकाजालादेखील बसला. विधीमंडळाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने काल कामकाज होऊ शकले नाही.

आज हवामान खात्याने पुढील ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज नागपूरमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. नागपूरच्या महापालिकेत भाजपाची सत्ता असताना नागपूरात पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले आहे. विधीमंडळाचे कामकाज आणि नागपूरात पुरस्थिती निर्माण झाल्यामुळे आजच्या दैनिक सामनामध्ये देखील शिवसेना अध्यक्षांनी अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Related posts

पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या जागी विक्रम कुमार नवे पालिका आयुक्त

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी साताऱ्याला रवाना

News Desk

“बेळगावमध्ये बऱ्याच वर्षांनी वाघ सिंहाचा खेळ सुरु, आता इथं माकडांचं काम नाही”

News Desk