HW News Marathi
मुंबई

पेंग्विनमुळे राणीच्या बागेत पर्यटक वाढले

मुंबई | भायखळा स्थित राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनमुळे राणीच्या बागेत येणा-या पर्यटकांची संख्या वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बागेतल्या पेंग्विनमुळे पर्यटकांची संख्या लाखांमध्ये तर उत्पन्न कोटींच्या घरात गेले आहे. गेल्या अर्थिक वर्षात ७० लाखांमध्ये असलेले उत्पन्न या वर्षांत पाच कोटींवर गेले आहे.

सध्या शाळेला लागलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे बच्चे कंपनीची राणीच्या बागेत पेंग्विन पाहण्यासाठी गर्दी होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे रोज राणीच्या बागेत येणा-या पर्यटकांची संख्या हजारोंच्या घरात गेली आहे. २६ जुलै २०१६ रोजी बागेत हंबोल्ट पेंग्विन पक्षी आणण्यात आले होते. येत्या काळात राणीच्या बागेत वाघ सिंह देखील आणण्यात येणार आहेत. पेंग्विन चा प्रोजेक्ट हा पहिल्या टप्यातला प्रोजेक्ट होता लवकरच विविध प्रकारचे प्राणी राणी बागेत पहायला मिळणार आहेत.

सहा महिन्यांचा महसूल खालीलप्रमाणे-

  • ऑक्टोबर – ७१७८६५५
  • नोव्हेंबर- ४४६२६३०
  • डिसेंबर – ६५२८४७०
  • जानेवारी – ५०२६३१५
  • फेब्रुवारी – ४५७२९०५
  • मार्च – ४२३८७१५

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईदच्या दिवशी अचानक झालेल्या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा

News Desk

नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला शेअर बाजारात ऐतिहासिक वाढ

News Desk

Dahi Handi | पथनाट्याच्या माध्यमातून पारंपारिक सणांची जनजागृती

News Desk