HW Marathi
मुंबई

पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

पालघर | गेल्या काही दिवसांपासून पालघरमध्ये भूकंपाचे हादरे बसत आहेत. काल (७ फेब्रुवारी) सायंकाळी देखील भूकंपाचे धक्के पालघरमधील स्थानिकांना जाणवले होते. तर आज (८ फेब्रुवारी) पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. डहाणू आणि तलासरी या भागात ३.३ रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता नोंदविण्यात आली आहे. सतत होणाऱ्या भूकंपामुळे येथील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

पालघरमध्ये गेल्या आठवड्यात चार वेळा भूकंपाचे हादरे बसले होते. या भूकंपाच्या हादऱ्यात २ वर्षाच्या चिमुकीलाच मृत्यू झाला आहे. यानंतर प्रशासनाकडून याची दखल घेत भूकंपमापक यंत्रणा बसविण्यात आली आहे. या परिसरात सतत भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे अशा परिस्थितीचा सामना कसा करायचा याचे भूकंपग्रस्त नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

 

Related posts

लिंग बदलून नौदलात काम करणाऱ्या तरुणाचा पर्दाफाश

News Desk

आरे परिसरात अग्नितांडव

News Desk

मनसेकडून ठाणे स्टेशनवरील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड

News Desk