HW Marathi
मुंबई

‘या’ ४ पूल दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल काल (१४ मार्च) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या जखमींना जीटी, सेंट जॉर्ज आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल गुरुवारी(१४ मार्च) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींवर जीटी, सेंट जॉर्ज आणि सायन रुग्णालयात उपाचर सुरू आहेत.

 

अंधेरी पूल दुर्घटना

अंधेरी-विलेपार्ले रेल्वे स्टेशनदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा काही भाग ३ जुलै २०१८ रोजी  कोसळाला होता. ही घटना सकाळाच्या सुमारास घडली होती. अंधेरी दुर्घटनेत अस्मिता काटकर यांचे  कूपर रुग्णालयात निधन झाले. तसेच या दुर्घटनेत द्वारकाप्रसाद शर्मा (४७) आणि गिरीधर सिंग(४०) हे जखमी झाले होते.

एलफिन्स्टन पूल दुर्घटना

मध्य रेल्वेचे परळ स्टेशन आणि पश्चिम रेल्वेचे प्रभादेवी (एलफिन्स्टन) स्टेशन यांना जोडणाऱ्या पुलावर २९ सप्टेंबर २०१७ रोजी चेंगराचेंगरी होऊन २३ जणांचा मृत्यू झाला होता. ही दुर्घटना ऐन गर्दीच्या  वेळी मोठा आवाज झाल्याच्या गैरसमजातून धावपळ सुरु झाली. ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले, यावेळी झालेल्या चेंगराचेगरीमुळे मोठ्या प्रमाणात जीवतहानी झाली.

 

सावित्री पूल दुर्घटना

यापूर्वी कोकणातील रायगड मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल (३ ऑगस्ट २०१६) ही दुर्घटना झाली होती. या भीषण दुर्घटनेत २२ ते ३० लोकांचे बळी गेल्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेच्या तब्बल दहा दिवसांनंतर सावित्री पूल दुर्घटनेत नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तीन वाहनांपैकी राजापूर-बोरीवली एसटी बसचा शोध लागला होता.

 

 

 

 

Related posts

परळ आणि एलफिन्स्टन स्थानकांना जोडणार नवीन पुल

राज्य महिला आयोगाकडून ‘सुहिता’ महिलांसाठी हेल्पलाइन

प्लास्टिक बंदी विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

News Desk