HW News Marathi
मुंबई

रेल्वेच्या निषेधार्थ उपोषण

कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या कारभाराचा निषेध म्हणून आणि प्रवाशांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी वासिंद रेल्वे स्थानकाबाहेर साखळी उपोषण करण्यात आले. कल्याण-कसारा तिसरी मार्गिका जलदगतीने पूर्ण करणे; आसनगाव, आटगाव व टिटवाळा येथे होमफलाटाचे काम त्वरित सुरू करणे; कल्याण ते कसारा मार्गावरील स्थानकाच्या फलाट उंचीचे काम ताबडतोब सुरू करणे; महिला प्रवाशांसाठी प्रत्येक स्थानकात नवीन शौचालय बनविणे; उंबरमाळी व तानसेत या स्थानकांचे काम ताबडतोब हाती घेणे; आंबिवलीप्रमाणेच टिटवाळा, खडावली, वासिंद, आसनगाव, आटगाव, कसारा या मंजुरी मिळालेल्या एफओबीचे काम जलदगतीने सुरू करणे या प्रमुख मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. तसेच, अनेक संस्था व राजकीय पक्षांच्या स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक मतदानाला सुरुवात; जाणून घ्या… ‘या’ मतदारसंघ किती मतदार, मतदान केंद्र

Aprna

डॅडी लॉकडाऊनमध्ये काय करत आहेत जाणून घ्या…

swarit

पश्चिम किनारपट्टीवर बुलबुलची परिक्रमा

News Desk