HW News Marathi
मुंबई

पर्यावरणपूरक उपक्रमाने प्लास्टिक बंदीचे स्वागत

मुंबई |अंघोळीची गोळी आणि वसुंधरा ग्रीन क्लब या संस्थेच्या माध्यमातून प्लॅस्टिक पिशवी द्या रोपटे घ्या हा उपक्रम रामनारायण रुईया महाविद्यालयात राबवण्यात आला. प्लॅस्टिकच्या पाच पिशव्यांच्या बदल्यात एक रोपटे देत अनोख्या आणि पर्यावरणपूरक उपक्रमाने प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी ३२३ प्लॅस्टिक पिशव्या जमा झाल्या तर ७० रोपांचे वाटप करण्यात आले.

आम्ही अंघोळीची गोळी या संस्थेमार्फत पाणी आणि पर्यावरण या घटकांवर काम करीत आहोत गेले काही महिने खिळेमुक्त झाडे या उपक्रमांतर्गत रस्त्यावरच्या झाडांवरील ठोकलेले आणि रुतलेले खिळे तारा काढून ट्री गार्डमध्ये साचलेला कचरा काढून झाडांना स्वतंत्र आळे करून झाडे खिळेमुक्त कचरामुक्त व आळेयुक्त करीत आहोत असे अंघोळीची गोळी संस्थेचे तुषार वारंग यांनी सांगितले. वृक्षसंवर्धनासाठी आम्ही हे पाऊल उचललं आहे असेही ते यावेळीं म्हणाले.

नुकत्याच झालेल्या प्लास्टिक बंदी निर्णयाचे औचित्य साधत या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हीं ही लोकचळवळ व्यापक करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. हा उपक्रम करण्यासाठी रामनारायण रुईया महाविद्यालयाचे एन एस एसचे डॉ. नीलिमा जगभिये, अक्षय जाधव, दिशा धडवे, श्रीनाथ गुरव यांनी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमास निर्भया ग्रुप, वसुंधरा ग्रीन क्लब, आवाज फाउंडेशनच्या मदतीने तळागाळात पोहचवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे असे यावेळी अंघोळीची गोळी संस्थेचे जयेश हरसोरा यांनी सांगितले.

Related posts

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घोषणांनी अंधेरी स्थानक दणाणले

News Desk

भुजबळांना केईएम मधून डिस्चार्ज

News Desk

तरूणावर धारदार शस्त्राने वार करणारा गुन्हेगार अटक

News Desk