HW News Marathi
मुंबई

बाबासाहेबांना अनोख अभिवादन

मुंबई | देश व राज्यातील वातावरणतसेच जनतेचा सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला भ्रमनिरास याविषयी जनजागृती करण्यासाठी १४ एप्रिल पासून वर्षभर राज्यभरात वोट हमारा ,राज हमारा मतदार जनजागृती तसेच संविधान जनजागृती अभियान सुरु करण्यात येत असल्याची घोषणा 14 एप्रिल रोजी भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेच्या वतीने करण्यात आली .

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त भीम आर्मी महाराष्ट्रच्या वतीने हारफुलांऐवजी एक वही एक पेन अर्पण करून चैत्यभूमी दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली .यावेळी महाराष्ट्र महासचिव सुनील थोरात , सुनील गायकवाड,रणधीर आल्हाट ,अविनाश गायकवाड , नेहाताई शिंदे ,ऍड .रत्नाकर डावरे, सीताराम लव्हांडे, संतोष वाकळे ,प्रितेश चितळे , वर्षाताई कांबळे,विजय कांबळे , दीपक जगदेव,सुनील वाकोडेयांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी आपल्या या अभियानाची घोषणा केली.

राज्य तसेच देशातील मागासवर्गीयांसह सर्वच मतदारांच्या अपेक्षा केंद्र तसेच राज्य सरकारने काही अंशी पूर्ण करण्याच्या अपेक्षा असताना या दोन्ही सरकारकडून जनतेचा अपेक्षभंग झाला असल्याची नाराजी कांबळे यांनी व्यक्त केली . दलित मागासवर्गीय, मुस्लिम , महिला विद्यार्थी या देशात सुरक्षित राहू शकत नाहीत हे ताज्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे , नोक-या नसल्यामुळे सुशिक्षित तरुण भरकटत चालला असून महागाईनेही उच्चांक मोडला आहे .मराठा समाज आरक्षण ,शेतकरी कर्जमाफीच्या केवळ होत असलेल्या घोषणा , मंत्रालयाचे झालेले आत्महत्यालय तसेच सरकारमधील सहकारी पक्षामध्ये देखील नसलेला ताळमेळ यामुळे राज्यातील जनता त्रस्त झाली असून यापुढे त्यांच्या एका मताची किंमत काय आहे, आपले एक मत काय करू शकते, भारतीय संविधानाने जनतेला काय अधिकार दिलेले आहेत याविषयी महाराष्ट्रातील जिल्हा, तालुका व गावस्तरावर “हमारा वोट, हमारा राज” असे मतदार जनजागृती तसेच संविधान साक्षरता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मीचे प्रदेश प्रमुख अशोक कांबळे यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

झगमगणाऱ्या ‘सीएसएमटी’ स्थानकाची वाजपेयींना श्रद्धांजली

News Desk

लोअर परळचा पूल आजपासून बंद, चाकरमान्यांचे हाल

News Desk

कल्याण-मुरबाड मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील

News Desk