HW News Marathi
मुंबई

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का नाही?

मुंबई | एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का नाही, अशी विचारणा करून या नकारात्मक व उदासीन भूमिकेतून सरकारची असंवेदनशीलता दिसून आल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

प्रभादेवी अर्थात जुन्या एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेला एक वर्ष झाल्याच्या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून विखे पाटील म्हणाले की, या घटनेत अनेक कुटुंबांनी घरातील एकमेव कमावता व्यक्ती गमावला होता. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून ज्या कुटुंबातील आर्थिक आधार हरपला असेल, त्या कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी आम्ही रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक राहुल जैन यांची भेट घेऊन रेल्वे मंत्र्यांना लिहिलेले पत्र आपण त्यांच्याकडे सोपवले होते. मुख्यमंत्र्यांनी देखील या घटनेतील गरजू कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यासंदर्भात पाठपुरावा करावा, अशी मागणी आम्ही केली होती. परंतु, आता वर्षभरानंतरही एका कुटुंबाला देखील रेल्वे खाते नोकरी देऊ शकलेले नाही.

महाराष्ट्र सरकार व रेल्वे विभागाने पीडितांना आर्थिक मदत दिली. परंतु, कमावता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांसाठी ही एकरकमी मदत पुरेशी नाही. या कुटुंबांच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह लागले असून, त्यांना कायमस्वरूपी आधार देण्याची आवश्यकता आहे. आता रेल्वे प्रशासन सांगते की, आम्ही नोकरीचे आश्वासन दिले नव्हते. त्यांनी नोकरीचे आश्वासन दिले नव्हते, हे खरे असले तरी एल्फिन्स्टनचे बळी हे रेल्वे विभागाच्या बेफिकीरीचे बळी होते. त्यामुळे गरजू पीडित कुटुंबांना संपूर्ण पाठबळ देणे, हे त्यांचे नैतिक कर्तव्यच आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची आणि गरजू पीडित कुटुंबांची मागणी लक्षात घेता या घटनेतील मृतकांच्या वारसांना रेल्वेत सामावून घेण्याची आवश्यकता असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटरच्या पोलीस कोठडीत १० एप्रिलपर्यंत वाढ

News Desk

Dahi Handi | ठाण्यात पहायला मिळणार प्रो-गोविंदा स्पर्धेचा थरार, 10 थरांसाठी 21 लाखांच बक्षीस

News Desk

दिल्लीसह मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

Aprna
महाराष्ट्र

गडकरींच्या गावात भाजपचा पराभव ही आगामी पराभवाची नांदी !

swarit

मुंबई | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जन्मगाव असलेल्या धापेवाडा (ता. कळमेश्‍वर) ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा दारूण पराभव करत काँग्रेसने एकहाती विजय मिळविला आहे. भाजपचा हा पराभव आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील भाजपाच्या पराभवाची नांदी असून देशातील व राज्यातील जनता पुन्हा काँग्रेसला निवडून देईल असा विश्वास व्यक्त करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील यशाबद्दल काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

यासंदर्भात बोलताना खासदार चव्हाण म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षात भाजप सरकारने मोठं मोठ्या घोषणा व खोटी आश्वासने देण्यापलिकडे काहीही केले नाही. महागाई रोखण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनाचे दर कमी करण्याऐवजी इंधनावर अन्याय्य कर व अधिभार लावून सरकार सर्वसामान्यांची लूट करित आहे. सरकारच्या संरक्षणात उद्योगपती बँकांचे हजारो कोटी रूपये घेऊन परदेशात पळून जात आहेत. शेतक-यांच्या मालाला हमीभाव नाही. तरूणांच्या हाताला रोजगारी नाही. महिला सुरक्षित नाहीत. केंद्र आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. जनतेचा भाजप सरकारवर विश्वास राहिला नाही त्यामुळेच नितीन गडकरी यांचे जन्मगाव धापेवाडा आणि गडकरींनी दत्तक घेतलेल्या व पहिली डीजीटल ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध पाचगावातील जनतेने भाजपचा पराभव केला आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या वाराणसीतील गावात व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातही भाजपचा पराभव करून जनतेने काँग्रेसच्या हाती सत्ता दिली आहे.

गेल्या साडेचार वर्षात देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत जनतेने भाजपचा पराभव केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या फुलपूर लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. महाराष्ट्रातल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला. भाजपचा भ्रष्ट आणि धर्मांध चेहरा देशातील जनतेसमोर आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत भाजपचा पराभव करून जनता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आणेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.

Related posts

येत्या काळात आम्ही राष्ट्रवादी बळकट करु, रोहिणी खडसेंचा निर्धार

News Desk

विधानसभेत राडा; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन

News Desk

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी घेतलेला निर्णय केला रद्द …

News Desk