HW News Marathi
मुंबई

शेतकऱ्यांची ‘थप्पड की गुंज’ सामनातून सरकारवर टीका

मुंबई | शेतकऱ्यांनी मुंबईत येऊन सत्ताधाऱ्यांना दिलेली ‘थप्पड की गुंज’ कायम स्वरुपी स्मरणात राहील आणि अन्नदाता शेतकरी आणि कष्टकरी यांच्या जीवनाची राखरांगोळी करण्याचे धाडस ते यापुढे तरी करणार नाहीत. बळीराजाने राज्यकर्त्यांना दिलेली ही शेवटची संधी आहे. मागण्यांचे पूर्ततेचे तुम्ही लेखी आश्वासन दिले आहे. ते तरी आता पाळ.’ अशी टीका शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रातून केली.

शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मोर्चातून नाशिकहून मुंबईत धडकलेल्या लाल वादळाने सरकारला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे सरकाला त्यांच्या मागण्या मान्य करणे बंधनकारक होते. शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मोर्चा हा आठवडाभर नाशिकहून मुंबईच्या दिशने पायी २०० कि.मीचा प्रवास करत मुंबईत दाखल झाला आहे. या मोर्चात राज्यातील विविध जिल्ह्यातील ४० हजारपेक्षा जास्त शेतकरी सामील झाले होते. शेतकऱ्यांच्या या विराट मोर्चाला राज्यातील मोठ्या पक्षानी पाठिंबा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वसईच्या चिंचोटी धबधब्यावर 40 जण अडकले

News Desk

आगामी निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार

News Desk

मी आमदारांनी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर

News Desk
मुंबई

अंधेरी स्टेशनजवळ पुलाचा काही भाग कोसळला, दोन जण जखमी

News Desk

मुंबई | पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्टेशनजवळ असलेल्या पादचारी पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी कोसळला. हा पुल रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालेला पहायला मिळत आहे. या घटनेमुळे चर्चगेटहून विरारकडे जाणारी व विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.

प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 वरील ही घटना आहे. अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग कोसळल्याची माहिती सध्या समोर आली आहे. 7.35 वाजण्याच्या सुमारास हा गोखले पूल कोसळला आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सकाळी कार्यालयात जाणा-या चाकरमान्यांची घाई असते अशा वेळी हा पुल कोसळल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Related posts

Live Updates | नरेंद्र मोदी मुंबई दौरा

News Desk

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा, सर्वसामान्यांची पाटी कोरीच! विखे पाटील

News Desk

मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर दिवसाकालीन ब्लॉक रद्द

News Desk