HW News Marathi
मुंबई

कंगना विरोधात दाखल करण्याचे आदेश, धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप

मुंबई | सतत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत विरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना हा आदेश दिला असून यामुळे कंगनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंगनासोबत तिची बहीण रंगोलीविरोधीतही एफआयआर दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे. कंगना आणि रंगोली ट्विट आणि मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप आहे.

सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार केली होती. तसेच कंगनाचे ट्वीट, व्हिडीओ या व्यक्तीने न्य़ायालयात सादर केले होते. न्यायालयाने आज कंगनावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत आहे. कंगना वारंवार आक्षेपार्ह ट्विट करत असून यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अबब ! अर्शद वारसीच्या वीज बिलाची इतकी किंमत?

News Desk

सामाजिक कार्यकर्त्या सरोज कामत यांना सक्षम महिला पुरस्कार प्रदान

Gauri Tilekar

सरकार आहे की नकारघंटा?: विखे पाटील

swarit