HW News Marathi
मुंबई

मुंबईच्या नेपीएन्सी रोडवरील इमारतीला लागली आग, कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई | आज पहाटे मुंबईच्या नेपीएन्सी रोडवरील एका इमारतीला आग लागली. अँटलास अपार्टमेन्ट असे या इमारतीचे नाव असून तातडीने या इमारतीतील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ही आग लागली होती. मात्र, अग्निशामक दल वेळेत पोहोचल्याने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

यात सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही आहे. या आगीत दोन महिला वरच्या मजल्यावर अडकल्या होत्या त्यांना अग्मिशामक दलाने सुखरुप बाहेर काढले आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही आहे.

मात्र, अग्निशामक दलाने शिडीचा वापर न करता बाजूच्या इमारतीतून आगीवर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नकेला असा आरोप रहिवाश्यांनी अग्निशामक दलावर केला आहे. सुरुवातीला आगीवर नियंत्रण आणण्यासाठी स्प्रेचा वापर करण्यात आला आणि नंतर शिडीच्या वापराने आग आटोक्यात आणण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेच्या वाहतुकीला ब्रेक, वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल

News Desk

मुंबईतील चौपाट्या आता लवकरच होणार चकाचक

swarit

रविवारी मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक

News Desk