डोंबिवली | कपड्याला लागणारे साहित्य पुरवणाऱ्या शारदा प्रोसेस कंपनीच्या चार मजली गोदामाला आग लागली आहे. ही घटना डोंबिवली येथील एमआयडीसीतील कंपनीच्या गोदामाला आज (४ जुलै) पहाटेच्या सुमारास आग लागली आहे. आगीची माहिती मिळातच केडीएमसीचे ७, उल्हासनगर, भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाचा प्रत्येकी एक आणि डोंबिवलीएमआयडीसीचा १ बंब घटनास्थळी दाखल झाला आहे. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
डोंबिवलीतील एमआयडीसी फेज-२ परिसरातील आग लागली. कपड्यांसाठी साहित्य पुरविणाऱ्या या गोदामात कच्चा माल असल्याने या मालाने पेट घेतला. त्यामुळे आग भडकली. तसेच मध्यरात्रीची वेळ असल्याने वाऱ्यामुळे ही आग आणखीनच पेटली. परिणामी आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात धूराचे लोटही पसरले. त्यामुळे एमआयडीसी परिसरातील नागरिकांना श्वसनास त्रास झाल्याने या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांना घटनेची माहिती दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.