मुंबई | वरळीतील साधना हाऊस या कमर्शियल इमारतीला शनिवारी(३० डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे १२ जवान जखमी झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवताना श्वसनाचा त्रास झाल्याने हे जवान जखमी झाले असून त्यांना केईएम आणि पोतदार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Mumbai: Fire broke out in the stock of medicines and chemicals on the ground floor at Sadhana Industrial Estate in Worli at around 4:46 pm today. Total 12 fire staff were injured, stable now. Firefighting operations continue. #Maharashtra pic.twitter.com/vexurYeDNn
— ANI (@ANI) December 29, 2018
साधना साधना हाऊसच्या तळमजल्यावरील औषधे आणि रसायणांच्या साठ्याला आग लागल्याची माहिती अग्निशामन दलाच्या जवानांनी दिली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी ८ बंब, रुग्णवाहिका पाठवून देण्यात आली. मुंबईमध्ये अग्नीतांडव थांबवण्याचे काही नाव घेताना दिसत नाहीत. शनिवारी सकाळी कमला मिल परिसरातील एका बांधकाम सरू असलेल्या इमारतीस आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास वरळीतील साधना हाऊस इमारतीला आग लागली. बारा तासाच्या आत मुंबईतील ही आगी लागण्याची दुसरी घटना घडली होती.
Mumbai: Level-2 fire breaks out in Sadhana House behind Mahindra Towers in Worli area. Firefighting operations underway. More details awaited. pic.twitter.com/gv7ZKserkI
— ANI (@ANI) December 29, 2018
या इमारतीत असलेल्या मेडिकल आणि केमीकलच्या गोडाऊनमध्ये ही आग लागली होती. या ठिकाणी औषधे, केमिकल, केबल्स आणि प्लास्टिकचा साठा असल्याने या आगीत मोठा धूर पसरला. यामुळे वरळी परिसरात सगळीकडे धुराचे लोट पसरले होते. आगीवर नियंत्रण मिळवताना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने अग्निशमन दलाच्या १२ जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
या आगीमध्ये अग्निशामन दलाचे जवान विशाल विश्वासराव आणि स्वाती सातपुते यांच्यासह धुरामध्ये गुदमरलेल्या ५ जवानांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आग विझविताना अग्निशामन दलाचे जवान विजय मालुसरे, रमेश हिरामन महाले, रमेश बाबर, बालाजी ढगे, राजू लिनार आणि सुबोध पेडणेकर हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोतदार रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.