HW Marathi
मुंबई

भायखळा परिसरातील स्टेशनरी दुकानात आग

मुंबई | भायखळा पूर्वे येथील रामभाऊ भोगले मार्गावरल स्टेशनरीच्या दुकानाला पहाटे आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु स्टेशनरीच्या दुकानात भरलेल्या फटाक्यांमुळे आग लागल्याने शजारील आणखी ती दुकाने या आगीत जळून खाक झाली आहेत.  भायखळा अग्निशमन दलातील जवानांनी या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न आग विझविण्यात यश आले आहे.

ज्या तुकानाला आग लागलेली त्याच्या शेजारी मेडिकल आणि दूध डेरीमधून चार दुकानदारांची सुखरुप सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

 

Related posts

माथाडी कामगारांचा आजपासून बेमुदत बंद

News Desk

अर्ध्या तासापासून हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

चोरीचा मोबाइल ठरणार निकामी

News Desk