HW Marathi
मुंबई

मुंबईत मुसळधार पाऊस, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई | मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस  सुरू आहे. मुंबईत आज (४ सप्टेंबर) सलग दुसऱ्यादिवशी पावसाचा जोर कायम आहे.  ठाणे, कल्याण, भिंवडीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. नवी मुंबई, वसई-विरार आणि पालघरमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची अंदाज हवामान खात्याने विचारला आहे. ठाणे आणि रायगडमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी परिसरात रेल्वे रुळ पाण्याखाली, सीएसएमटीच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक ३० मिनिटे उशिराने सुरु आहे.  पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईसह मालागाड, दादर, हिंदमाता सायन, किंग सर्कलमध्य पाणी साचले आहे. मुंबई, ठाणे आणि कोकणातील शाळांना शालेय शिक्षण मंत्री अशीष शेलार यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

Related posts

यंदा मुंबईकरांची पाण्याची समस्या मिटणार ?

News Desk

मनोहर भिडेला अटक करा अन्यथा २६ रोजी मुंबईत मोर्च

News Desk

ठाण्यात तृतीय पंथीला मनसे कार्यकर्त्याकडून बेदम मारहाण

News Desk