HW News Marathi
मुंबई

फोर्टमधील पटेल चेंबर्स इमारतीला भीषण आग

मुंबई : मुंबईच्या फोर्ट परिसरातील पटेल चेंबर्स इमारतीला भीषण आग लागली आहे. ही इमारत सहा मजली असून शनिवारी सकाळी ही आग लागली आहे. या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट परसले आहेत. घटनास्थळी १८ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. पटेल चेंबर्स या इमारतीत कुणीही रहिवासी राहत नव्हते.

 

आग तिसऱ्या टप्प्यात असताना १२ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होत्या. त्यानंतर आग चौथ्या टप्प्यात असताना १८ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलालचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना इमारतीचा एक भाग कोसळल्याने अग्निशमनचे दोन जखमी झाले आहेत. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मुंबईत सध्या आगीचे सत्र थांबण्याचे चित्र दिसत नाही. गेल्या काही आठवड्यापुर्वी सिंधीया हाऊस येथे आग लागली होती. या आगीतून पाच जणांना वाजवण्यात यश आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भिडेंना अटक करा, आठवले घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी केले बदल

News Desk

जनतेशी संवादच न राहिल्यानं सरकारवर संवादयात्रेची वेळ – खा. अशोक चव्हाण

News Desk
महाराष्ट्र

१२ जूनपर्यंत मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा

News Desk

मुंबई | पहाटेपासून मुंबईसह उपनगर, ठाणे, भिंवडी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबईची लाईफलाईनवर कोणताही परिणाम झालेला नाही. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरू आहेत. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. १२ जून पर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.

मुंबई उपनगरामध्ये रात्रभरात सर्वाधिक पाऊस मुलुंड, भांडुप भागात झाल्याची नोंद आहे. याशिवाय कांजूरमार्ग, पवई, अंधेरी, वांद्रे परिसरात रिमझिम पाऊस सुरु आहे. तसेच भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे सखल भागात पाणी साचले. ५० ते ६० घरात पावसाचे पाणी शिरले. जैतुनपुरा भागात इलेक्ट्रिक पोलचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाला असून भिंवडीत वीज पुरवठा खंडित झाला आहे.

Related posts

पंकजांसोबत आजही बहिणीसारखचं नातं, फडणवीसांच्या वक्तव्यावर पंकजांचं ‘हे’ उत्तर

News Desk

‘सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोना विरोधात’ – उद्धव ठाकरे

News Desk

“भाजपचे बेगडी मुंबई प्रेम!”, राऊतांची भाजपवर टीका

News Desk