मुंबई | स्वातंत्र दिनी देशात जन्माला येणारा पहिलाच पेंग्विनचा जन्म मुंबईच्या राणीच्या बागेत झाला आहे. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात एक नवीन चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दक्षिण कोरियावरून आणलेल्या पेंग्वीनपैकी एका जोडप्याला आज बाळ झाले आहे. गेल्या ४० दिवस अंड्याला ऊब दिल्यानंतर बुधवारी रात्री त्यातून बेबी पेंग्वीन जन्मला आहे. शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात एक पेंग्वीन जन्माला आल्याची माहिती दिली.
We have some great news coming in from Rajmata Jijamaya Udyaan (Byculla Zoo)! Our 🐧 parents have delivered a freedom baby! The parents and the chic are doing well. My congratulations to all those involved in this process, especially Dr. Tripathi & his team and Sudhir Naik ji!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 16, 2018
या नव्या पाहुण्याच्या आगमनाने उद्यान्यातील सर्व कर्मचाऱ्यांनाही आनंद झाला आहे. बुधवारी अडीच वर्षीय हेबोल्ट पेंग्विनच्या अंड्याला आज ४० दिवस पूर्ण झाले आहेत. पेंग्विनची अंडी फुटुन बाहेर येण्याचा कालावधी हा ४० ते ४५ दिवसांचा असतो, असे देखील राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.
राणीची बागेत नव्या पाहुण्याचे आगमन,स्वातंत्र्यदिनी मुंबईतील पेंग्विन कुटुंबामध्ये चिमुकला पाहुणा #MUMBAI #Penguins pic.twitter.com/YK5WBgCjAx
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) August 16, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.