HW News Marathi
मुंबई

शुभ मंगल सावधान… धावत्या लोकलमध्ये तुलसी विवाह संपन्न!

मुंबई घरातील कामे उरकून रोज सकाळी वेळेत कामावर पोहोचता यावे याकरीता मुंबईकरांची लोकल पकडण्याची धावाधाव सुरू असते. सद्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि कामाच्या बिझि शेडुल्डमुळे मुंबईकरांना आपले सण साजरे करणे दुरापास्त झाले आहे. पण गुरूवारचा दिवस मात्र रेल्वे प्रवाशांसाठी अनोखा दिवस ठरला. गर्दीने खचाखच भरलेल्या विरार लोकलमध्ये काही प्रवाशांची लगबग सुरू झाली. लोकच्या डब्यातील इतर प्रवाशांना काय होतेय याची कल्पनाच नव्हती आणि इतक्यात

गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा!….
आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा!…
अशी मंगलाष्टके कानावर पडली आणि प्रवाशांच्या चेह-यावर काही क्षण आनंदाचे तरंग उमटले. निमित्त होते तुलसी विवाहाचे. धावत्या लोकलमध्ये प्रवाशांनी आपला पारंपारीक सण साजरा केला.
विरारहून चर्चगेटकडे निघालेल्या धावत्या लोकलमध्ये हा तुलसी विवाह पार पडला. ट्रेन सुरू होताच लोकल प्रवाशांच्या एका ग्रुपने आपला रोजचा डबा पताकांनी सजवला होता. डब्यात कंदीलही लावला होता.दोन सीटच्यामध्ये सजवलेली तुळस ठेवून मधोमध आंतरपाट धरलेला…. इतक्यात कोणीतरी फुलांच्या स्वरूपातील अक्षता वाटण्यास सुरूवात केली…. आणि थोड्याचवेळेत शुभ मंगल सावधान….अशी मंगलाष्टके सुरू झाली. आंतरपाट बाजुला सरकताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.अर्ध्या तासाच्या या सोहोळ्यात प्रवाशांनी एक वेगळाच अनुभव अनुभवला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामाजिक कार्यकर्त्या सरोज कामत यांना सक्षम महिला पुरस्कार प्रदान

Gauri Tilekar

मुंबई मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडमुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी

News Desk

मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार, तिन्ही मार्गावरील रेल्वेची वाहतूक उशीरने सुरू

News Desk