HW News Marathi
मुंबई

गोविंदा रे गोपाळा…..

मुंबई – न्यायालयाने थरांचे स्वातंत्र्य दिल्यामुळे यंदाचा दहिकाला मुंबई- ठाण्यात जोरदार रंगला आहे. देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि त्यातच गोविंदांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे.

मुंबईतील काळाचौकी, लालबाग, परळ, दादर, वरळी परिसरांमध्ये दहिहंडी फुटायला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. आता हळूहळू गोविंदांनी मोर्चा उपनगरांकडे आणि ठाण्याकडे वळविला आहे. घाटकोपरमध्ये आमदार राम शिंदे यांनी सर्वांत उंच हंडी बांधली आहे, तर ठाण्यात जोगेश्वरीच्या जय जवान पथकाने १० थर लावण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे दोन हंड्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळी दादर येथील आयडीयलची हंडी पाहायलाही मोठी गर्दी झाली होती. महिलांच्या पथकाने पाच थर लावून ही हंडी फोडली. उच्च न्यायालयाने बालगोविंदाचे वय कमी करून १८ वरून १४ केले असले, तरीही न्यायालयाने सुरक्षे संबंधी उपायायोजना करण्याचेही निर्देश दिले होते. सुदैवाने या निर्देशांचे बहुतांश ठिकाणी पालन होताना दिसत आहे. सर्वांत उंचावर चढणाऱ्या गोविंदाला सुरक्षा जॉकेट आणि हॅलमेट बहुतेक सर्वच मंडळांनी दिल्याचे दिसते.

दरम्यान, या थर लावताना पडून काही गोविंदा जखमीही झाले आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयात ७, तर सायन रुग्णालयात ३ जखमी गोविंदांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर  टिका करणा-या दोघांवर गुन्हा दाखल

News Desk

‘चितळे बंधुं’चे कामगार संपावर!

News Desk

शाश्वत विकासासाठी युवकांच्या आंतरराष्ट्रीय ज्ञान समुदायाची सुरुवात

swarit