HW News Marathi
Covid-19

मुंबई महापालिकेची होळी आणि धुलिवंदनसाठी नियमावली जारी

मुंबई | कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुंबईतील रूग्ण मृत्यूदराचा दर कमी झाला असला तरी रूग्णवाढीचा वेग मात्र जास्त आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने होळी आणि धुलिवंदन साजरा करण्यासाठीची नियमावली जारी केली आहे. यानुसार सार्वजनिकरित्या होळी सण साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी

मुंबईत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून होळी आणि धूलिवंदन/ रंगपंचमी हा उत्सव खासगी किंवा सार्वजनिक जागेत साजरा करण्यात मनाई करण्यात येत आहे. तसेच मी जबाबदार या मोहिमेतंर्गत वैयक्तिरित्याही हा सण साजरा करणे टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच जो कोणी या नियमांचे पालन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्येत काल पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळत आहे. मुंबईत काल दिवसभरात ३५१२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर १२०३ रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत काल दिवसभरात ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 6 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. १०० दिवसांच्या पुढे असणारा हा कालावधी आता ९० दिवसांवर आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

News Desk

स्वत: काही न करता सोनू सूदवर टिका,हाचं तुमचा माणुसकीचा धर्म का ?

News Desk

‘एन-95’ मास्क किंवा कोणतेही मास्क असो ते ठराविक किंमतीत विकावे

swarit