मुंबई | हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कॉटन ग्रीन आणि शिवडी रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे सीएसएमटीकडे जाणारी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पनवेल-सीएसएमटीकडे जाणारी हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वेचा खोळंबा झाला. यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे गाड्या १५ ते २० उशीराने धावत आहेत.
Central Railway: PL-32 Panvel-CSMT Harbour line local held up between Sewri and Cotton Green due to technical problem. Technical team on the job to restore. #Mumbai
— ANI (@ANI) July 10, 2019
मध्य रेल्वेच्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत आहेत. कल्याण, डोंबिवलीहून दररोज हजारो प्रवासी सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करतात. आज (१० जुलै) जवळपास २० मिनिटे लोकल उशिराने सुरू असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. टाटाचा वीजपुरवठा बंद झाल्याने कल्याण-कसारा व कल्याण-कर्जत दिशेकडील मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही वेळात समस्या निकाली निघेल अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच मध्य रेल्वेवर या बिघाडासंदर्भात रेल्वे स्थानकात उद्घोषणा करुन प्रवाशांना सूचित केले गेले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.