मुंबई | मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना कार्यालयांमध्ये पोहचण्यास विलंब होत आहे. शहरात सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुक देखील मंदावली आहे. पुढील पाच दिवसात मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
Heavy rainfall continues to lash Mumbai.Visuals from Wadala. #MumbaiRain pic.twitter.com/4tIMGylPgl
— ANI (@ANI) July 10, 2018
मुंबईच्या डबेवाल्यांना डबेवाला असोसिएशन कडून आज सकाळी ७ वाजताच घरातून डबे न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्यामुळे आज मुंबईत डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्यात आली, असल्याची माहिती डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली आहे. गेल्या २४ तासात मुंबईत १६५.८ मिमी तर उपनगरात १८४.३ मिमी पावसाची नोंद आणि विरारमध्ये २४ तासात २३५ मिमी तर वसईत २९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Visuals of heavy rain and waterlogged streets from Mumbai's Byculla. #MumbaiRain pic.twitter.com/Jj1IZn31jN
— ANI (@ANI) July 10, 2018
बोरिवली ते विरार रेल्वे सेवा पूर्णपणे बंद
मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसामुळे बोरिवली ते विरार लोकल सेवा पुर्णपणे बंद आहे. नालासोपा-यासह काही स्टेशनवरील ट्रॅकवर पाणी साचले आहे. तर बोरिवलीपासून विरार अप-डाऊन लोकल सेवा ठप्प झाली आहे. बोरिवलीपासून चर्चगेटच्या दिशेने धावणा-या लोकल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरला पावसाने चांगलेच झोडपले आहे.
#Mumbai Early morning visual from Nallasopara station, where Up and Down through line train service is halted due to water logging following heavy rains #MumbaiRains pic.twitter.com/DpvAtSk5gD
— ANI (@ANI) July 10, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.