HW News Marathi
मुंबई

इतिहासाची माहिती व्हावी यासाठी चिमुकल्याची ऐतिहासिक वेशभूषा

मुंबई | आज गुढी पाडवा अर्थात मराठी नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात पहायला मिळाले. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीमध्ये देखील दरवर्षी प्रमाणे यंदाही गुढी पाडव्याचा उत्साह पहायला मिळाला. धारावी येथील महाराष्ट्र सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गुढी पाडव्या दिवशी पारंपरिक वाद्याच्या सहाय्याने धारावी परिसरात रॅली काढली जाते. यंदा या रॅलीचे 11 वे वर्ष होते. या रॅलीत मोठ्यापासून लहानगण्यांनी सहभाग घेतला होता.

  • इतिहासाची माहिती व्हावी यासाठी चिमुकल्याची ऐतिहासिक वेशभूषा

विशेष म्हणजे या रॅलीमध्ये शिवाजी महाराज, विठ्ठल-रुक्मिणी, झाशीची राणी, स्वामी विवेकानंद यांचा वेष परिधान करून लहान मुलांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.

  • सामाजिक कार्यातही मंडळाचा सहभाग

विशेष म्हणजे फक्त गुडीपाडवा रॅली एवढ्यावरच हे मंडळ न राहता हे मंडळ सामाजिक कार्यात देखील महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. दुष्काळ ग्रस्तांना मदत अशी अनेक समाजपयोगी कामे या मंडळाने आजवर हाती घेतल्याचे या मंडळाच्या तरुणांनी सांगितले.

  • म्हणून काढतात रॅली

सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीमध्ये अनेक धर्माचे लोक राहतात. त्यामुळे आपल्या सर्व मराठी बांधवाना एकत्र आणून आपली मराठी हिंदू संस्कृती जोपासता यावी, तसेच विभागातील तरुणांना इतिहासाची माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही दरवर्षी गुढी पाडवा जल्लोषात साजरा करतो अशी माहिती या मंडळातील सभासदांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोटच्या लेकीला धरणात फेकले

News Desk

रिलायन्सच्या कार्यालयावर कॉंग्रेसची पोस्टरबाजी

News Desk

वांद्रे येथील झोपडपट्टयांना आग

swarit