HW News Marathi
मुंबई

भिडेंना अटक करा, आठवले घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई | भीमा कोरेगाव प्रकरणात भिडे असो किंवा कोणी असो, त्यांना अटक करावी, एकबोटेंना अटक झालेली आहे. हल्ला करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी पकडलेले आहे, त्यामुळे त्या तरुणांच्या चौकशीतून वस्तुस्थिती समोर येईल. या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

य़ुनोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करता आली नाही. त्यात भारत सरकारचा काहीही संबंध नसल्याचे आठवले यांनी सांगितले. उद्या सुषमा स्वराज यांना भेटणार असून वस्तूस्थिती जाणून घेणार आहे. भारत सरकारने जयंती साजरी करण्यास परवानगी नाकारली आहे. यात काही तत्थ नसल्याचे आठवले यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू

Aprna

गोखले पूल दुर्घटनेनंतर रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लुट

News Desk

चित्रपटगृह मालक विनामूल्य दाखवणार वृक्षलागवडीचे संदेश

News Desk
देश / विदेश

अण्णा हजारे यांच्या सामाजिक कामांचा अनुभव हार्दिक पटेलच्या वयाच्या दुप्पट

News Desk

नवी दिल्ली | अण्णा हजारे यांचे उपोषणाला संघाची फूस असल्याचा गंभीर आरोप पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी केला आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी हार्दिक पटेल अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी रामलीला मैदानात गेला होता. पण, कोणत्याही राजकीय नेत्यांनी मंचावर येण्यास खुद्द अण्णा हजारे यांनी सक्त मनाई केली आहे. अण्णा हजारे हे २३ मार्चपासून उपोषणाला बसले आहेत. जनलोकपालची अंमबलजावणी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणुकी संदर्भातील मागण्यांसाठी अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत. हार्दिक पटेल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अण्णा हजारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

  • अण्णांच्या हजारे यांच्या उपोषणाला संघाची फूस | हार्दिक पटेल

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला संघाची फूस असल्याचा गंभीर आरोप पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांनी केला आहे.’ गेल्या चार दिवसापासून अण्णा हजारे हे उपोषणाला बसले आहेत. शनिवारी हार्दिक पटेल अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी मंचावर जाणार होता. पण, अण्णांनी त्यांना मंचावर येऊ न देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे हार्दिक नाराज झाला असून त्यांने अण्णा हजारे यांच्यावर टीका केली.

‘शेतकऱ्यांनी आंदोलन हातात घेतल्यानंतर सरकार अस्वस्थ होईल. हा आक्रोश शांत करण्यासाठी आंदोलन संघाच्या हाता देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.’

“मला मिळालेल्या माहितीनुसार अण्णा हजारे मंचावर भेटणार नव्हेत. ते मंचाच्या पाठीमागेच भेटणार होते. आमच्या सरकार विरोधी पक्षातील आंदोलना उपोषणातील सहभागावर अण्णांचा इतका आक्षेप का? मागे जे आंदोलन झाले होते. त्या विरोधी पक्ष नव्हाते का? मग आता इतकी टोकाटी भूमिका? तुम्ही जे मुद्दे उचलेल आहेत. त्याला जर विरोधकांची सात असेल तर मग तुम्हाल विरोधाकांना लांब का ठेवत आहात, असा सवाल हार्दिक पटेल यांनी यावेळी उपस्थित केला. दिल्लीवाल्याच्या इशाऱ्यावर मला या उपोषणात सहभागी होई दिले नाही, असा आरोप पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी केला आहे.”

  • सुरेश पाठारे यांचे हार्दिक पटेल याला प्रयुत्तर

‘हार्दिक पटेल हा पाटीदार आंदोलन करुन मोठा झाला आहे. त्यांचे जेवढे वय आहे. त्यांच्यापेक्षा दुप्पट अण्णांच्या सामाजिक कार्याचा अनुभव आहे. अण्णांनी काँग्रेस सत्तेत असताना उपोषण केले होते. तेव्हा त्यांचे उपोषणाला भाजपाचे समर्थन असल्याचा आरोप होत होता. आताचे अण्णा हजारे यांचे उपोषण हे काँग्रेसचे समर्थन असल्याचे म्हटले जात असे सुरेश पाठारे यांनी म्हटले आहेत.’

हार्दिक पटेल यांनी अण्णा हजारे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. या आरोप-प्रत्यारोपचे पुढे काय पडसाद उमटणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहेत.

Related posts

आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यासह देशभरात आंदोलन

News Desk

जगातील १०० टॉप ब्रॅण्ड्समध्ये टाटा समूह ठरला एकमेव भारतीय ब्रँड

News Desk

नेतन्याहू यांनी पत्नी सारासह चरखा चालवला आणि पतंगही उडवली

swarit