HW News Marathi
मुंबई

गॅस कर्मचार्‍याला महिला कार्यकर्त्यांनी दिला ‘मनसे’ स्टाईलने चोप

 

ठाणे | महानगर गॅसच्या कार्यालयात तक्रार घेऊन गेलेल्या महिलेला कर्मचाऱ्याने मारहाण केल्याने मनसेच्या महिलांनी कर्मचार्‍याला चांगलाच चोप दिला. घटनास्थळी वागळे पोलिसांनी महानगर गॅसच्या कर्मचार्‍याला आणि मनसेच्या महिलांना ताब्यात घेतले आहे. ठाण्यात वर्तक नगर भागातील महानगर गॅस बाबत जाब विचारले असता व्यवस्थापकांनी उलट जाब देत महिलांना मारहाण केली आहे. मनसे महिला कार्यकर्त्यांना आणि महानगर गॅस कर्मचाऱ्यांना वागळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी वागळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही बाजूच्या लोकांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत अशी माहिती मनसेच्या कार्यकर्त्याकडून मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन दिवस धावपट्टी बंद

News Desk

काळा घोडा कला महोत्सवाला पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट

Aprna

मुंबईच्या अधोगतीला शिवसेना जबाबदारः पृथ्वीराज चव्हाण

News Desk