HW News Marathi
मुंबई

अंधेरी पोटनिवडणुकीत मालपा डोंगरीमध्ये जाऊन आशिष शेलारांनी मतदारांची घेतली भेट

मुंबई | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (andheri east assembly by-election) मालपा डोंगरी भागात आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी घरोघरी जाऊन वैयक्तीक भेटी घेऊन मतदारांशी थेट संवाद साधला.

 

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली असून गेले दोन दिवस मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार या मतदार संघात प्रचार व नियोजन कार्यात आहेत. काल त्यांनी या मतदार संघातील निवडणूक संचलन समितीची बैठक घेतली तर मुंबईती भाजपा आमदार, पदाधिकारी यांची बैठक घेऊन प्रचाराच्या जबाबदारीचे वाटप केले.

 

आज आमदार ॲड आशिष शेलार यांनी मालपा डोंगरी नंबर ३ या मराठी लोकवस्ती असलेल्या भागात दौरा करुन थेट मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. या त्यांच्या संवाद रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांच्या सोबत उमेदवार मुरजी पटेल, वॉर्ड अध्यक्ष अविनाश भागवत व भाजपा पदाधिकारी सहभागी झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकरांसाठी नवीन वर्सोवा-बांद्रे सी-लिंक

News Desk

मानखुर्दमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांनी केली पोलिसांना मारहाण

News Desk

दाऊदची पत्नी मुंबईत आली होती

News Desk