HW News Marathi
मुंबई

वित्त अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत मुंबई विद्यापीठाचा ६५६ कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई । मुंबई विद्यापीठाचा तब्बल ६५६ कोटींचा अर्थसंकल्प शनिवारी (२३ फेब्रुवारी) मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये अचानक सादर करण्यात आला. विशेष म्हणजे या वेळी विद्यापीठाचे रजिस्ट्रार आणि वित्त अधिकारी उपस्थित नसल्याने या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी रजिस्ट्रार यांचे प्रभारी म्हणून परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या संचालकांनी मंजुरी दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या या मनमानी कारभाराविरोधात सिनेट सदस्य प्रचंड नाराज आहेत.

मुंबई विद्यापीठाचा यंदाचा अर्थसंकल्प हा तब्ब्ल ५६५ कोटींचा असून अर्थसंकल्प मांडण्याआधी मॅनेजमेंट कौन्सिलची मंजुरी आवश्यक असते. या बैठकीत मॅनेजमेंट कौन्सिलच्या सदस्यांची उपस्थिती कमी असूनही अनपेक्षितपणे हा अर्थसंकल्प मांडण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फेरीवाल्यांनी मनसे पदाधिका-यालाच झोडपले

News Desk

वांद्रेमधील गरीब नगर झोपडपट्टीमध्ये भीषण आग

News Desk

मानखुर्दमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांनी केली पोलिसांना मारहाण

News Desk
कृषी

शेतकरी सन्मान योजनेचा बोजवारा, शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले पैसे गेले परत

News Desk

विशाल पाटील मुंबई | मोठा गाजावाजा करत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचं उद्घाटन केले मात्र या योजनेचा नांदेडसह राज्यात बोजवारा उडालाय हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले दोन हजार रुपये काही तासांतच परत करण्याचे आदेश अनेक बँकाना आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.रविवार असूनही केंद्र सरकारच्या निर्देशाने सर्वच बँकाचे कामकाज सुरु होतं.

केंद्र शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेतील 6 हजार रूपयांपैकी दोन हजारांचा पहिला हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होते असाच प्रकार वाळूंज ता.नगर येथील शेतकरी मिनीनाथ निमसे यांच्या बाबतीत झाला आहे. निमसे यांना मेसेज मोबाईल वर मिळाला. त्यांनी याबाबत एटीएम मधून आपले बँक स्टेटमेंट काढले असता त्यांच्या खात्यावर २४ फेब्रुवारी रोजी २ हजार रूपये जमा झाल्याचे दिसून आले पण त्याच खात्यातून ते परत माघारी वळविण्यात आल्याचेही दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान केलाय की अपमान अशी चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.

साडेचार वर्षाच्या नाकर्तेपणावर निवडणुकीपूर्वी पांघरून घालण्यासाठी सरकारने चालविलेल्या घिसाडघाईमुळेच हा गोंधळ होतो आहे. शेतकऱ्यांना यामुळे मदती ऐवजी मनस्तापच वाटयाला येणार हे उघड आहे. शेतकऱ्यांचा हा सन्मान नव्हे अपमान आहे. अशी टीका किसान सभेचे डाॅ अजित नवले यांनी केलीय

Related posts

अर्थसंकल्पात शेतकरी हाच केंद्रबिंद

News Desk

कृषी विद्यापीठांमध्ये नॅनो टेक्नॉलॉजी विभाग सुरू होणार

News Desk

वऱ्हाडात यंदा करावी लागणार तिबार पेरणी

News Desk