HW News Marathi
मुंबई

फेरीवाल्यांनी मनसे पदाधिका-यालाच झोडपले

मुंबई: फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेने उघडलेल्या मोहिमेमुळे आता फेरीवाले आक्रमक झाले आहेत. मनसे कार्यकर्ता आणि विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्या डोक्यावर रॉडने वार करण्यात आले आहेत. फेरीवाल्यांनी केलेल्या या हल्ल्यात सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मालाडकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळते आहे. सुशांत माळवदे आणि इतर चार ते पाच मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आहे. दुपारी ३.३० च्या सुमारास सुशांत माळवदेंवर हा जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या सुशांत माळवदेंवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.मनसे कार्यकर्ते आनंद सोनी यांनी त्यांच्या आणि सुशांत माळवदे यांच्या फेसबुक पेजवर रूग्णालयातील फोटो अपलोड करून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. मालाड स्टेशनबाहेर फेरीवाले बसले आहेत की नाही याची पाहाणी सुशांत माळवदे आणि इतर मनसे कार्यकर्ते करत होते त्याचवेळी हा हल्ला झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील कांदिवलीसह भिवंडीत अग्नितांडव

News Desk

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीने राजकारण तापले; 3 महिन्यांपासून स्थानिकांची पाण्यासाठी वणवण

Chetan Kirdat

कल्याण,कुर्ला व ठाणे मुंबईतील तीन अस्वच्छ रेल्वे स्थानक

News Desk