HW Marathi
मुंबई

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटरनंतर सहाय्यक अभियंत्याला अटक

मुंबई |  सीएसएमटी स्टेशनजवळील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी डी. डी. देसाईज कंपनीच्या नीरजकुमार देसाई अटक केल्यानंतर आझाद मैदना पोलिसांनी काल (१ एप्रिल) पालिकेचा सहाय्यक अभियंत्याला बेड्या ठोकल्या आहेत. एस. एफ. काकुळते असे या अभियंत्याचे नाव आहे. काकुळते यांना आज (२ एप्रिल) मॅजिस्ट्रेट कोर्टात करणार हजर करण्यात येणार आहे. हिमालय पूल १४ मार्च रोजी कोसळला होता. यात सहा जणांचा मृत्यू झाला असून ३९ जण जखमी झाले होते.

या प्रकरणात आझाद मैदना पोलिसांकडून करण्यात आलेली दुसरी अटक आहे. या आधी स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाईला अटक केली. देसाई यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर काकुळते याला हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करणया आली आहे. काकुळतेच्या निरीक्षणाखाली २०१३-१४ मध्ये हिमालय पादचारी पुलाची डागडुजी करण्यात आली होती. तसेच त्याला पुलाची स्ट्रक्चरल ऑडिट आणि रिपेअरिंगच्या कामाबद्दल माहिती होती.

 

Related posts

मुंबईच्या हवेत वाढते धुरक्याचे प्रमाण

News Desk

सीएसटीजवळ लोकल घसरली

News Desk

होय, मी अधिकाऱ्याला झापलं – महापौर महाडेश्वर

News Desk