HW News Marathi
मुंबई

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटरच्या पोलीस कोठडीत १० एप्रिलपर्यंत वाढ

मुंबई | सीएसएमटी स्टेशनजवळील हिमालय पूल दुर्घटना प्रकरणात ऑडिटर नितीन देसाई यांच्या न्यायालयीन कोठडीत १० एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नीरजकुमार देसाई सोमवारी (१८ मार्च) स्ट्रक्‍चरल ऑडिटरला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या प्रकरणात देसाई यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही पूल दुर्घटना शुक्रवारी (१५ मार्च) घडली होती. यात सहा जणांचा मृत्यू झाला असून ३९ जण जखमी झाले होते.

या प्रकरणात पुलाची दुरूस्ती करणाऱ्या आरपीएस कंत्राटदाराला शनिवारी (१६ मार्च) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले होते. या नोटीसला उत्तर देण्यासाठी १५ दिवसाचा कालावधी देण्यात आला होता. हिमालय पुलाची २०१३ मध्ये या पुलाची दुरूस्ती आरपीएस या कंत्राटदाराने केली होती. २०१७-१८ यादरम्यान या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. या ऑडिटमध्ये पुल धोकादायक नससल्याचे सांगत किरकोळ दुरूस्तीची असल्याचे देसाई याने सांगितले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक होणार अंडरग्राऊड

News Desk

मेट्रो-३ च्या रात्रीच्या कामाला अखेर उच्च न्यायालयाची परवानगी

Gauri Tilekar

1300 मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

swarit