HW News Marathi
मुंबई

मंत्रालयात पुन्हा एकदा महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई | शारदा अरुण कांबळे या महिलेने आज (१८ जानेवारी) मंत्रालयाच्या गेटजवळ रॅकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मंत्रालयाच्या सुरक्षा रक्षकांनी वेळीस महिलेला वाचविले. शारदा त्यांना वाचविल्यानंतर विचारपूस केल्यानंतर त्यांच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे. मंत्रालय सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तापास पोलीस करत आहे. यात शारदा यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी एप्रिल २०१६ मध्ये वाशीनाका येथील एजंट मीना अनिल पगारे यांच्या मदतीने उदय रघू शेट्टी या नावाच्या सावकाराकडून २ लाख रुपये साडे बारा टक्के व्याजाने घेतले होते. व्याजाने पैसे घेतान तारण म्हणून शारदा यांच्याकडून तीन कोरे चेक घेतले.

शारदा यांना एप्रिल महिन्यात बीसी लागल्यामुळे त्यांनी सावकाराला १ लाख रूपये दिले. यानंतर सावकरांने साडे बारा टक्क्याने साडे चार लाख रुपये एवढे पैसे झाले होते. तेही पैसे मी फेडले. यानंतर ही उदय आणि मीना पगार यांनी सतत पैशांची मागणी करत होते. यानंतर या दोघांनी शारदा यांनी दिलेल्या कोऱ्या चेकवर १५,५०,००० ऐवढी रक्कम टाकून उड्डपी कर्नाटक येथील बँक खात्यात जमा केले. आणि माझ्या बँक खात्यात एवढी रक्कम नसल्यामुळे सदर चेक बाउन्स झाला. यानंतर सावकराने त्यांच्या वकिलाद्वारे शारदा यांना मार्च २०१७ रोजी रक्कम परत मागण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली होती. माझ्याविरुद्ध खोटा खला दाखल करण्याची धमकी दिली.

शारदा यांनी सुसाईड नोटमध्ये काय लिहिले

सावकाराने पाठविलेल्या नोटीसमध्ये शारदा यांनी १५,५०,००० पैसाचा चेक दिल्याचे नमूद करण्यात आली आहे. तसेच शारदा यांनी जानेवारी आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये ७ लाख रुपये परत केल्याचा उल्लेक केला आहे. माझ्या खात्यावर १५ हजार देखील जमा नसताना. सावकाराने कर्नाटकातील उड्डपी येथील न्यायालयात दावा दाखल करून शारदा यांना त्रास देत आहे. एकाच वर्षात २ लाखांचे साडेचार लाख रुपये शारदा यांनी सावकाराला परत केल्यानंतरही त्यांचा छळ होत आहे. यानंतर मीना पगारे यांनी ५० हजार रुपयांचा चेक बँकेत टाकला. हा चेक बाऊन्स झाल्यानंतर पुन्हा एकदा मीना यांनी कुर्ला येथील कोर्टात खोटी तक्रार दाखल केली. यासर्व प्रकारणामुळे शारदा या आत्महत्या करत असल्याचे त्यांनी या सुसाईड नोटमध्ये लिहले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

Aprna

महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात आज वरळी बंदची हाक

Aprna

संभाजी भिडेंच्या अटकेसाठी विधानभवनात निदर्शने

News Desk