HW News Marathi
मुंबई

भारतीय जहाजाला जलसमाधी, वसईचा राजेश नायर बेपत्ता

मुंबई वसई पॅसिफिक महासागरात भारतीय जहाजाला जलसमाधी मिळाली आहे. या दुर्घटनेत 10 भारतीय खलाशीही बुडाले आहेत. या दहामध्ये वसईमध्ये राहणा-या राजेश नायर यांचाही समावेश आहे. घटना 13 ऑक्टोंबर रोजी घडली असून. एमराल्ड स्टार असे जहाजाचे नाव आहे. गेल्या तीन दिवसापासून हाँगकाँग आणि जपानच्या समुद्रकिनारी भागात नायर यांच्यासह 10 खलाशांचा शोध सुरु आहे.हॉंगकॉंग आणि जपानच्या कोस्ट गार्ड टीमकडून शोध मोहीम सुरु आहे. हेलिकॉप्टरची मदतही घेण्यात आली आहे. 33 हजार 205 टनच्या या जहाजातून केमिकल घेऊन जात होते.

इंडोनेशियातून चीनला जात असताना अचानक जहाज बुडत असताना आजूबाजूला असणाऱ्या तीन जहाजांनी या जहाजातील 16 जणांना वाचवले. मात्र दहा जणांना वाचवता आलं नाही.राजेशच्या कुटूंबीयांना राजेश बेपता असल्याची माहिती मिळताच संपुर्ण परिवार चिंतेत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३० एप्रिल पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचे पत्रक मागे

News Desk

मुस्लिम ओबीसी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात शासन सकारात्मक – राजकुमार बडोले

News Desk

डॉ. आंबेडकर स्मारकाचा खर्च १६६ कोटींनी वाढला

News Desk