HW News Marathi
मुंबई

लालाबागच्या राजाचा दरबार आता सरकारच्या ताब्यात

मुंबई । प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळावर दरवर्षी दर्शनावेळी कार्यकर्ते आणि पदाधिक-यांच्या मुजोरी दिवसेंदिवस वाढत जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मुजोरीचा शिकार पोलीस आधिकारी झाला. यानंतर धर्मादाय आयुक्तांनी लालबागचा राजा मंडळाच्या विरोधात आलेल्या तक्रारींची दखल घेत तेथील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे

राज्य धर्मादाय आयुक्तांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश सोमवारी (१५ ऑक्टोबर)ला दिले आहे. या समितीकडे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगांचे यांचे नियोजनाचे अधिकार या समितीकडे सोपविता आले असून गणेशोत्सवाच्या आठ दिवस आधी समिती दर्शन रांगेबाबत धोरण ठरवणार असल्याचे सांगितले जात आहे.

मंडळाच्या पदाधि-यांनी रांग मोडून ओळखीच्या लोकांना पुढे पाठवू नये, अशी ताकीद धर्मादय आयुक्तांनी दिली. जर असा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाणार आहे. तसेच महिला भक्तांना सुरळीतपणे दर्शन घेता यावे, यासाठी मंडळाने महिला स्वयंसेवकांची नेमणूक करावी लागणार आहे. तरी सुद्धा दर्शनच्यावेळीस काही वाद झाल्यास धर्मदाय आयुक्तालयाचा निर्णय अंतिम राहील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल नियुक्त आमदार नको म्हणून राज्यपालांच्या निर्णयाला फडणवीसांचा पाठिंबा

News Desk

संविधान वाचवणे हीच महामानवास खरी आदरांजली ठरेल ! – नाना पटोले

News Desk

सैफी बुऱ्हानी ट्रस्टचा गृहनिर्माण प्रकल्प नागरी पुनरुत्थान घडविणारा! – देवेंद्र फडणवीस

Aprna