HW News Marathi
मुंबई

वेश्या व्यवसायातून सुटका झालेल्या तरुणीचे मोदींना पत्र

मुंबई – वेश्या व्यवसायात बळजबरीने ओढल्या गेलेल्या आणि वर्षानुवर्षे तिथे नरकयातना भोगणाऱ्या महिलांची कैफियत मांडणारे पत्र या व्यवसायातून सुटका झालेल्या एका २४ वर्षिय तरुणीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. तिच्या आणि तिच्यासारख्या अनेकींच्या दु:खाची कहाणी सांगणाऱ्या चिठ्ठीसोबत तिने राखीही ‘मोदी भाईं’ना पाठविली आहे. तिच्यासारख्या अन्य भगिनींची मुक्तता करण्याचे आवाहन तिने मोदींना केले आहे.

कोलकातामधील एका छोट्या गावात राहणाऱ्या लक्ष्मीला (बदललेले नाव) ६ वर्षांपूर्वी तिच्या प्रियकराने नोकरीच्या बहाण्याने मुंबईत आणून कामठीपुरा येथील वेश्याबाजारात 60 हजारांना विकले. सुरुवातीला तिने देहव्यापाराला नकार दिला.मात्र तिला तब्बल एक आठवडा दोरीने बांधून अंधाऱ्या खोलीत उपाशी ठेवण्यात आले. तसेच तिला अमली पदार्थ आणि वय वाढवण्याची इंजेक्शने देण्यात आली. यादरम्यान तिच्यावर अनेकदा बलात्कार करण्यात आले.

तब्बल सहा वर्षे कोठ्यावर नरक यातना भोगणाऱ्या लक्ष्मीप्रमाणे १२० हून अधिक मुली येथे कैदेत आहेत. काही दिवसांपूर्वी एक ग्राहक लक्ष्मीसाठी देव बनून आला. त्याने मुंबईतील एका एनजीओला तिची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने कोठ्यावर धाड टाकून तिची सुटका करण्यात आली आणि तिला एका गारमेंट कंपनीत काम देण्यात आले. दरम्यान,लक्ष्मीचे पत्र आणि राखी घेऊन महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर मोदींना भेटल्या. पंतप्रधानांनी लक्ष्मीची राखी आपल्या हातावर बांधल्याचे रहाटकर यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दारुच्या नशेत बाथटबमध्ये बुडून अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू | फॉरेन्सिक रिपोर्ट

News Desk

गांजाची होते फ्री होम डिलिव्हर!

News Desk

तरूणीवर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न

News Desk