HW News Marathi
मुंबई

महापालिकेच्या पत्रकार कक्षाला कुलूप, मनसेचा पालिकेत धिंगाणा

मुंबई | मुंबई महापालिकेत असलेल्या पत्रकार कक्षाला कुलूप असल्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेला परवानगी नाकारल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. पत्रकार कक्षाला कुलूप लावल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी जनसंपर्क कक्षात धडक मारुन जाब विचारला.

बीएमसीमधील या पत्रकार कक्षेत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे महापालिकेच्या एका आरक्षित भूखंडाबाबत पत्रकार परिषद घेणार होते. मात्र इथे पत्रकार परिषदेला परवानगी नसल्याचं कारण देत जनसंपर्क विभागाने या कक्षाला कुलूप लावलं. तसंच महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या संदीप देशपांडे यांनी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय खबाळे यांच्या कक्षात धडक मारत जाब विचारला. दरम्यान, यासर्व प्रकारामागे शिवसेना असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

एवढी घाबरलेली शिवसेना पहिल्यांदा पाहीली

आजपर्यंत शिवसेनेला इतरांच्या पत्रकार परिषदा उधळताना बघितले होते, स्वत:च्या पत्रकार परिषदा गाजवताना बघितले होते, पण आज पहिल्यांदा शिवसेनेला कुणाच्यातरी पत्रकार परिषदेमुळे घाबरलेले बघितले . शिवसेना आम्हाला घाबरली कारण, त्यांच्या मनातच काळेबेरे आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीच जनसंपर्क विभागाला मनसेची पत्रकार परिषद रोखण्यास सांगितले आणि पत्रकार कक्षालाच टाळे लावले, अशा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. दादरमधील शिवाजी पार्कच्या जिमखान्याच्या जागेवर नवा महापौर बंगला बांधण्याचा विचार सुरु आहे. इथे दहा हजार महापालिका कर्मचारी व्यायामशाळेत येतात आणि इतर मैदानी आणि बैठे खेळ खेळतात. इथे महापौर बंगला झाला तर मनसेचा विरोध राहिल. बंगल्याची एकही विट इथे रचू देणार नाही. असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. महापौर बंगल्याचा विषय आज पत्रकार परिषदेत होता, म्हणूनच शिवसेना घाबरली आणि माझी पत्रकार परिषद रोखली, असेही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सलग चौथ्या दिवशीही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

पोटच्या लेकीला धरणात फेकले

News Desk

आयसीटी शिक्षकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू – राज ठाकरे

News Desk
राजकारण

देशाला फसविणाऱ्या लोकांना मोदी सरकार मदत करते!

swarit

राजस्थान । “निरव मोदी, विजय माल्या व मेहुल चौकसी यांनी देशाला करोडो रुपयांचा चुना लावून निघून गेले आहेत. तरीही त्यांना केंद्र सरकार यांना मदत पुरवत आहेत”.असा आरोप काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. बुधवारी काल(१० ऑक्टोम्बर) राजस्थान दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान बिकानेरमध्ये त्यांची काल सभा होती. राहुल सभेदरम्यान राहुल यांनी मोदींना भाजप सरकारवर टीका केला आहे.

तसेच राहुल असे देखील म्हटले की, ” शेतकऱ्यांच्या सर्व समस्या पुर्ण दूर करू असे आश्वासन मोदी सरकारने निवडणुकीच्या आदी शेतकऱ्यांना दिले होते. सरकारने शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळणार आहे आणि दोन दशलक्ष बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील. परंतु सत्तेत आल्यानंतर मात्र मोदी सरकारला त्यांच्या आश्वासनांचा विसर पडला असल्याचे राहुल यांनी या सभेत बोलले. राहुल पुढे असे देखील म्हटले की, सरकारने नीरव मोदी, विजय माल्या आणि मेहुल चौकसी यांना परदेशात पैसे पुरविण्यासाठी राजस्थानमधील १७ हजार शाळा बंद केल्या आहेत.

 

 

Related posts

मराठी वाचवण्यासाठी साहित्यिक काय करतात: राज ठाकरे

swarit

दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन आणि दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका !

News Desk

पळ काढणारे चौकीदार नव्हे तर चोर असतात !

News Desk