HW News Marathi
मुंबई

लोअर परळचा पूल पदचाऱ्यांसाठी खुला

मुंबई | अंधेरी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे आणि पालिकेने पुलाचे ऑडिट करायला सुरवात केली. त्यानंतर कारीरोड, घाटकोपर, माटुंगा रोड आणि लोअर परळचा पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होतो. लोअर परळचा पूल पदचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. मुंबईतील लोअर परेल येथील वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेला पूल आता पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

आजपासून लोअर परेलचा हा पूल पादचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. परंतु या पूलावरून होणारी वाहतूक अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे. अंधेरी पूर्व येथील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर लोअर परेलचा पूल धोकादायक बनल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे हा पूल दुरुस्तीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पूल बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवासी आणि पादचारी यांची तारेवरची कसरत होत होती. लोअर परेल येथे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पादचाऱ्यांसाठी हा पूल पुन्हा सुरू करण्याची मागणी पालिका प्रशासनाने केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूर्व उपनगरांमधील उड्डाणपूलांखाली साकारणार ९ उद्याने

News Desk

कोस्टल रोड प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाकडून लाल झेंडा

News Desk

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, कल्याण ते अंबरनाथदरम्यान पॉवरब्लॉक

News Desk