HW News Marathi
मुंबई

लोअर परळ उड्डाणपुलाचे काम वेळेच्या आतच पूर्ण, पहिली एक्स्प्रेस रवाना

मुंबई | ना.म. जोशी मार्गावरील लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे जुने गर्डर काढून नवे टाकण्यासह अन्य काही कामांसाठी घेण्यात आलेला पश्चिम रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक अखेर संपला आहे. हा मेगाब्लॉक संपल्यानंतर लोअर परळ स्थानकावरून पहिली एस्क्प्रेस देखील सकाळी ७.४० वाजता रवाना झाली आहे.

खरंतर २ फेब्रुवारीला रात्री १० वाजल्यापासून ३ फेब्रुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत असे ११ तास लोअर परळ ते चर्चगेट स्थानकादरम्यान एकही लोकल धावणार नव्हती. मात्र, हे लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डरचे काम वेळेच्या आत पूर्ण करण्यात आले आहे. तब्बल ९० मिनिटांपूर्वीच हे काम पूर्ण झाल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लोअर परळ स्थानकाजवळील डिलाईन उड्डाणपुलाचे तोडकाम २ फेब्रुवारीला रात्री १० वाजल्यापासून सुरू करण्यात आले आणि वेळेआधीच हे काम पूर्ण झाल्याने सकाळी ७.४० वाजता पहिली अवंतिका एक्स्प्रेस लोअर परळ स्थानकाहून रवाना झाली. या कामासाठी दादर ते चर्चगेट स्थानकांदरम्यान विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येस बॅंकेला एसबीआयचा मदतीचा हात !

swarit

सचिन सावंत हत्येप्रकरणी 7 जणांना अटक  

News Desk

मराठी भाषा दिनीच मराठी शाळा बंद करण्याचे फर्मान!

News Desk