मुंबई : सालाबादाप्रमाणे यंदाही दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रध्वजवंदन, संचलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते,औद्योगिकमंत्री सुभाष देसाई, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर उपस्थित होते आदि मान्यवर उपस्थित होते.
मंगळवार १ मे रोजी ५८ व्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दादर मधील शिवाजी पार्क मैदानात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वाजता राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एस टी महामंडळातर्फे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजने अंतर्गत शहिदांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहिदांच्या 5 वीर पत्नींना एसटी चा मोफत आजीवन पास देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन आणि संचलनाचा समारंभ आज सकाळी शिवाजी पार्क, मुंबई येथे झाला. मा. राज्यपाल श्री सी. विद्यासागरजी राव यांच्यासमवेत या कार्यक्रमाला उपस्थित होतो. #महाराष्ट्रदिन#MaharashtraDay pic.twitter.com/VGy8r4yhwX
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2018
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन आणि संचलन समारंभातील हे काही क्षण…#महाराष्ट्रदिन#MaharashtraDay pic.twitter.com/8NCzWdyTW0
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2018
देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांच्या वीरपत्नींना एसटीचा आजीवन मोफत प्रवास पास मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माझे मंत्रिमंडळातील सहकारी श्री विनोद तावडेजी, श्री सुभाष देसाईजी आणि श्री दिवाकर रावतेजी उपस्थित होते. #महाराष्ट्रदिन #MaharashtraDay pic.twitter.com/d30XxXy7Pk
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.