HW News Marathi
मुंबई

शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉनचे आयोजन

मुंबई | महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्यावतीने मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दौडचे आज (९ फेब्रुवारी) महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन आयोजन केले आहे. शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व सामान्य जनतेपर्यंत पाहोचविण्याचा उद्देश या मॅरेथॉनचा असून समाजातील सर्व घटकांनी या मॅरेथोनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी केले आहे. मुंबईत आज होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना २ हजार फिजीओथेरेपिस्ट, ३०० होमिओपॅथी आणि आहारतज्‍ज्ञांचा मोफत सल्ला देणारे तज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत.

या मॅरेथॉनची सुरुवात आज सकाळी ५ वाजल्यापासून सुरु झाली असून ९ वाजेपर्यंत असणार आहे. ‘तंदुरुस्त भारत-फिट इंडिया’ या चळवळीद्वारे पोलीस आणि सर्वसामान्य नागरीक यांच्यात शारिरीक तंदुरुस्तीची जाणीव निर्माण व्हावी असा ठराव अखिल भारतीय पोलीस महासंचालकांच्या परिषदेमध्ये करण्यात आला होता. या ठरावानुसार महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडचे नियोजन विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश करीत आहेत.

ही मॅरेथोन ४२ किलोमीटरची फूल मॅरेथॉन, २१ कि.मी.ची हाफ मॅरेथॉन, १० मैल किंवा १६ कि.मी. दौड आणि ५ किलोमीटरची टाईम रन अशा चार प्रकारांत या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या फुल मॅरेथॉनचा मार्ग गेट वे ऑफ इंडिया ते राजीव गांधी सागरी सेतू आणि परत असा असणार आहे. हाफ मॅरेथॉन ही राजीव गांधी सोगरी सेतू येथून सुरू होऊन गेट वे ऑफ इंडिया येथे समाप्त होईल. १० मैलांची दौड राजीव गांधी सागरी सेतू ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत तर टाईम रन गेट वे ऑफ इंडिया ते एन.सी.पी.ए. पर्यंत असणार आहे.

या मॅरेथोनच्या मार्गावर महाराष्ट्र पोलीसांद्वारे ‘सजग आणि समर्थ’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून मुख्य दौडचा भाग म्हणून ३१ जानेवारीला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दौडचे आयोजन तसेच महाराष्ट्र पोलीसांच्या नेतृत्वाखालीही मिडनाईट इव्हेथॉनचेही आयोजन केले होते. यामध्ये महिला पोलीस अंमलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीसह १,२०० पेक्षा अधिक टायग्रेस मॉम्सनी सहभाग घेतला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलीने पळून जावून प्रेमविवाह केला, तिकडे आई-वडिलांनी रेल्वेखाली जीव दिला

News Desk

महासभेत नगरसेविका गेम खेळण्यात व्यस्त

News Desk

HW EXCLUSIVE : पोलीस भरतीत शक्तीवर्धक इंजेक्शनचा बोलबाला; मुंबईतील चाचणी डोपिंगच्या विळख्यात?

Chetan Kirdat