HW News Marathi
मुंबई

मेजर कौस्तुभ राणे शहीद, मीरारोडवर शोककळा

मुंबई | काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना ३ जवानांसह मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. मीरारोडचे रहिवासी असलेले कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्यामुळे शहर शोकसागरात बुडाले आहे.

सोमवारी रात्री काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये घुसखोर दहशतवाद्यांशी लढताना चार जवानांना वीरमरण आले होते. यात मीरारोडच्या शीतल नगर भागात राहणाऱ्या २९ वर्षांच्या मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांचाही समावेश आहे. मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच परिसरावर शोककळा पसरली. यानंतर राणे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली.

गुरुवारी सकाळी राणे यांचे पार्थिव त्यांच्या मीरा रोड येथील घरी आणले गेले आहे. सकाळी ९ पासून नागरिकांना अंत्यदर्शन घेता येणार आहे. सकाळी ११ च्या सुमारास अंत्ययात्रा निघणार असून, लष्करी इतमामात मीरा रोडच्या वैकुंठभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हाजी अली दर्ग्याचे लवकरच होणार सौंदर्यीकरण

swarit

महाराष्ट्राच्या हितासाठी अंहकार बाजूला ठेवला-उद्धव

News Desk

प्रत्यारोपणासाठी ‘यकृताचा’ ठाणे ते दादर लोकलप्रवास

News Desk
महाराष्ट्र

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज नागपूर बंद !

News Desk

नागपूर | आरक्षणाच्या मागणी साठी सकn मराठा समाजाने आज नागपूर बंद ची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला आहे. शहराच्या प्रमुख ठिकाणी अधिकाऱ्यांसह २ हजार जवान रस्त्यावर तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी १०० स्ट्रायकिंग फोर्स आणि क्विक रिस्पॉन्स टीमसुद्धा तैनात करण्यात आली आहे. बंदोबस्ता दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आल्याचे सध्या चित्र आहे.

९ वाजल्यापासून सुरु होणार आंदोलन

महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन व महाआरती करून आंदोलनाची सुरवात होईल.कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेऊन आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन मराठा समाजाच्या नेत्यांनी केले आहे.

काही शाळेंना सुट्टी

शिक्षण विभागाने शाळांना अधिकृत सुटी जाहीर केली नसली तरी,विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता नागपूरमधील काही शाळांनी आज औपचारिक सुट्टी जाहीर केली आहे.

Related posts

ST कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरण करण्यात अडचण काय? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना सवाल

Aprna

“ढाई आखर” राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतस‍िंह कोश्यारी यांना प्रथम पारितोषिक

News Desk

५० लाख रुपये द्या, अन्यथा वैद्यनाथ मंदिर RDX ने उडवू!; विश्वस्तांना आलेल्या पत्राने खळबळ

News Desk