HW News Marathi
मुंबई

लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतील गैरप्रकाराची न्यायालयीन चौकशी करा | धनंजय मुंडे

मुंबई | राज्य लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणार्‍या स्पर्धा परिक्षेत मागील दोन-तीन वर्षांपासुन बोगस (डमी ) विद्यार्थी बसवुन निवड केली जात असल्याचे प्रकरण अतिशय गंभीर असुन, या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

आज विधान परिषदेत नियम 93 अन्वये त्यांनी दिलेल्या सुचनेवर उत्तर देताना सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्यासाठी सीआयडी अंतर्गत एसआयटी स्थापन केली असल्याची माहिती दिली. त्यावर धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याने त्याची न्यायलयीन चौकशी करावी अशी मागणी केली. लोकसेवा आयोगाच्या परिक्षेला बसणारे लाखो विद्यार्थी मुंबईच्या आझाद मैदानावर मागील काही दिवसांपासुन सातत्याने आंदोलने करीत आहेत.

या आंदोलनाची दखल घेवुन त्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी ही मुंडे यांनी केली. यावर उत्तर देताना.मदन येरावार यांनी या प्रकरणी 24 आरोपींना अटक केली आहे, या रॅकेटच्या माध्यमातुन नौकरीस लागलेल्या उमेदवारांवरही कारवाई करण्यात येईल असे सांगितले. या पुढील काळात परीक्षेमध्ये डमी उमेदवार बसवुन हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी उपायोजना केल्या जात असल्याचे ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदा लहान गणेशमूर्त्यांना फायबरची प्रभावळ 

swarit

मुंबईच्या उच्चभ्रु वस्तीत नपुंसकता वाढली

News Desk

लोकल ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना मृत्यू झाल्यास रेल्वेकडून नुकसान भरपाई

swarit