HW News Marathi
मुंबई

भारतमाता चित्रपटगृहासमोर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

मुंबई | राज्यात गेल्या पाच दिवसांपासून मराठा समाजाने आंदोलनाला सुरुवात केली आहे. आपल्या मागण्यांसाठी कायदेशीर मार्गाने ५८ मूक मोर्चे काढूनही सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांना प्रतिसाद दिला नाही. तब्बल २ वर्षे संयमाने लोक चळवळ चालवूनही सरकारने दखल घेतली नाही. म्हणून मराठा समाजाने आता ठोक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. आणि पुन्हा एकदा राज्यात ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली.

मराठा समाजाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून आरक्षणासाठीचा लढा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाने राज्याभरात विविध ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. सध्या आंदोलन तीव्र होताना पाहायला मिळते. अनेक ठिकाणी बसगाड्या पेटवून आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरतील विठ्ठलाच्या शासकीय पूजेला मुख्यमंत्र्यांना येऊ देणार नाही. असा संताप जनक इशारा, मराठा समाजाच्या आंदोलकांनी सरकारला दिला आहे. राज्यभरात ग्रामीण भागात होणाऱ्या ठिय्या आंदोलनाला मुंबईसह उपनगरात विविध ठिकाणी मराठा बंधवांनी एकत्र येऊन पाठिंबा दर्शविला आहे.

परळी येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लालबाग येथील भारतमाता चित्रपटगृहासमोर मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. ७२,००० मेगा नोकरभरतीत मराठ्यांना डावलण्यापासून ते शिवस्मारकातील शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यापर्यंत असे अनेक मुद्दे मराठा बांधवानी घोषणांच्या माध्यमातून मांडले.

परळी, बीड येथे मराठा बांधव गेले ५ दिवस ठिय्या आंदोलन करत आहेत. परंतु सरकारने या ठिय्या आंदोलनाकडे स्पष्ट दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव प्रतिकात्मा ठिय्या आंदोलन मोर्चे काढून सरकारला जागे करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील मराठा बांधवांनी आज भारतमाता सिनेमागृहा समोरील पदपथावर ठिय्या आंदोलन केले.या ठिय्या आंदोलनात दोनशे मराठा बांधव सहभागी झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युटर्न म्हणजे उद्धव ठाकरे – नितेश राणेंची टीका

News Desk

गोरेगावात १५ गाळ्याना आग

News Desk

पासपोर्ट डिस्पॅच करण्याच्या नावाखाली अभिनेते धर्मेश व्यास यांची फसवणूक; ओशिवरा सायबर सेल पुन्हा अॅक्शन मोडवर

Chetan Kirdat